शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा प्रभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा प्रभार पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सोपविण्यात आला होता; ...

अकोला: जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा प्रभार पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सोपविण्यात आला होता; मात्र कामकाजाचा व्याप जास्त असल्याने या दोन्ही सभापती पदांचा प्रभार उपाध्यक्षांकडे सोपविण्याचे पत्र अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे साेपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी दिला.

गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेले प्रवर्गनिहाय आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त झाल्याने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी दिला. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडील शिक्षण व बांधकाम सभापतिपद आणि मनिषा बोर्डे यांच्याकडील महिला व बालकल्याण सभापतिपद रिक्त झाले. रिक्त झालेल्या सभापतिपदांचा अतिरिक्त प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ९ मार्च रोजी दिला होता. त्यानुसार शिक्षण व बांधकाम आणि महिला व बालकल्याण सभापतिपदांचा अतिरिक्त प्रभार अध्यक्ष्रांनी स्वीकारला. परंतु कामकाजाचा व्याप जास्त असल्याने शिक्षण व बांधकाम सभापतिपदांचा प्रभार उपाध्यक्षांकडे देण्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी २५ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी अध्यक्षांकडे सोपविण्यात आलेला जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा अतिरिक्त प्रभार उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २६ मार्च रोजी दिला. त्यानुसार उपाध्यक्ष सावित्री राठोड शिक्षण व बांधकाम सभापती पदांचा प्रभार स्वीकारणार आहेत.