शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अकाेलेकरांसाठी झाेननिहाय काेराेना चाचणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. ...

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. जानेवारीच्या अखेरीस पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेता शासन सतर्क झाले. राज्यात विदर्भातून अकाेला, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाने डाेके वर काढल्याचे समाेर येताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समाेर आले आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी काेराेना चाचणी वाढविण्यासाठी झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश शनिवारी वैद्यकीय आराेग्य यंत्रणेला दिले.

या ठिकाणी होईल चाचणी

काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्‍यासाठी आयुक्‍त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पूर्व झोन अंतर्गत कृषी नगर येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.२२, पश्चिम झोनमधील हरिहरपेठ येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.१९, उत्तर झोनमध्ये सिटी कोतवालीलगतच्या मनपा हिंदी मुलांची शाळा क्र.१ तसेच दक्षिण झोनमध्ये आदर्श कॉलनी येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र. १६ येथे चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी सकाळी १० ते २ या कालावधीत चाचणी करता येणार आहे.

भरतिया, कस्तुरबामध्ये लसीकरण

मनपाच्या भरतिया व कस्तुरबा गांधी रुग्णालयात काेराेना चाचणी करण्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला हाेता. आयुक्त निमा अराेरा यांनी उपराेक्त दाेन्ही रुग्णालयात हाेणारी काेराेना चाचणी बंद करीत या ठिकाणी केवळ लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. आयुक्तांच्या या निर्णायामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असून या ठिकाणी हाेणारी गर्दी टाळता येणार आहे.