शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

'स्टुडंट समरी' देणार विद्यार्थ्यांची 'ए टू झेड' माहिती

By admin | Updated: November 28, 2015 02:21 IST

माहिती समाविष्ट करण्यासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंतची मुदत.

प्रवीण खेते/अकोला : सरल प्रणाली अंतर्गत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती सादर केल्यानंतर आता स्कूल डेटाबेसमध्ये ह्यस्टुडंट समरीह्ण समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्टुडंट समरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ह्यए टू झेडह्ण माहिती मिळणार असल्याने सरल प्रणाली परिपूर्ण झाली आहे. आगामी काळात शासकीय योजना आखताना ही माहिती फायदेशीर ठरणार असून, माहिती समाविष्ट करण्यासाठी शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने आणि जलद व्हावे, यासाठी नवीन शैक्षणिक सत्रापासून राज्यभरात सरल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत स्कूल डेटाबेस, टीचर डेटाबेस आणि स्टुडंट डेटाबेस यामध्ये शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात आली आहे. वर्षभर सुरू असलेल्या या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ह्यस्टुडंट समरीह्णच्या स्वरूपात स्कूल डेटाबेसमध्ये संकलित करण्यात येत आहे. स्टुडंट समरीमध्ये विद्यार्थ्यांची ह्यए टू झेडह्ण माहिती मिळणार असल्याने विद्यार्थ्यांंसाठी योजना आखताना फायदेशीर ठरणार आहे, तसेच या माहितीमुळे शालेय योजनांमध्ये होणार्‍या घोटाळ्य़ांना आळा घालण्यास मदत मिळणार आहे; तथापि अद्यापही अनेक शाळांनी स्कूल डेटाबेसमध्ये स्टुडंट समरी समाविष्ट केली नसल्याने ३0 नोव्हेंबरपर्यंत शाळांना अंतिम संधी देण्यात आली आहे. अशी आहे ह्यस्टुडंट समरीह्ण विद्यार्थ्यांंचा जन्मदिवस, धर्म, जात, प्रवर्ग, परीक्षांमध्ये मिळालेले गुण (रिपोर्ट कार्ड), विद्यार्थी दाखल-खारीज क्रमांक, शाळेतील दाखल दिवस, विद्यार्थ्याला मिळालेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणार्‍या प्रत्येक चाचणीची माहिती तसेच विद्यार्थ्यांंशी संबंधित प्रत्येक माहितीचा लेखाजोखा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षकांची डोकेदुखी संपणार शिक्षकांना दरवर्षी संचमान्यता, यूडाइज यासाठी विद्यार्थी संख्या मोजावी लागत होती, तसेच विविध योजनांसाठी प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांंची माहिती गोळा करावी लागत होती. आता स्टुडंट समरीमुळे विद्यार्थ्यांंची माहिती एका क्लिकवर मिळणार असल्याने शिक्षकांची डोकेदुखी कायमची संपणार आहे.