शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घेणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:27 IST

महेश म्हात्रे यांचे आवाहन

ठळक मुद्दे  ‘नापासांची शाळा’ मनविसेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर करिअरच्या संधी बदलत गेल्या. तसेच सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. विकासाची कास धरायची असेल, तर विद्यार्थी, तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घेणे गरजेचे आहे,असे आवाहन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रविवारी जठारपेठस्थित उत्सव मंगल कार्यालयात आयोजित ‘नापासांची शाळा’ या कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील बदलते करिअर’ या विषयावर म्हात्रे बोलत होते. यावेळी मुंबई येथील महेश म्हात्रे, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने (पाटील) यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यांनंतर पहिली १० वर्ष देशाच्या विकासाचा वेग चांगला होता. यानंतर १९६२ मध्ये युद्ध झालं. त्यानंतर पुन्हा उतरत्या कळा लागल्या. मात्र, १९९१ पासून देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि तेथूनच करिअरच्या संधी बदलत गेल्या. सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे विकास घडवायचा असेल, तर तरुणाईला या बदलत्या संधींकडे बघण्याची गरज आहे, असेही महेश म्हात्रे म्हणाले.तरुणाईची स्पर्धा ही वेळेशी सुरू असून, वैयक्तिक पातळीवर आपण आपल्या स्वप्नांचा काय विचार करतो, हे महत्त्वाचे आहे. पण, आपण स्वत: काय आहोत, याचा विचारच आपण करत नसल्याने आपल्याला आपल्या क्षमता कळत नाहीत. आपल्या क्षमता कळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:शी संवाद साधण्याची गरज आहे, असे आवाहन प्रा. सतीश फडके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले यांनी केले. संचालन अनुजा जोशी यांनी, तर आभार मनविसेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी मानले. यावेळी महानगर अध्यक्ष ललित यावलकर, मनसे महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांची उपस्थिती होती.