शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही सव्वाशेच्यावर शिक्षक अतिरिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 01:28 IST

संचमान्यता दुरुस्तीची प्रतीक्षा: लवकरच समायोजनेची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची माहिती जिल्ह्यातील शाळांना मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. अद्याप काही शाळांची माहिती यायची आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची आॅनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यात सव्वाशेच्या वर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शाळांची संचमान्यता दुरुस्ती झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गतवर्षी जिल्ह्यामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील काही शिक्षक वगळता, उर्वरित शिक्षकांचे रिक्त जागा असलेल्या शाळांवर समायोजन करण्यात आले होते. यावर्षीसुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांकडून शिक्षकांची पदसंख्या, आरक्षण, रिक्त पदे याची माहिती मागविण्यात आली असून, अनेक शाळांनी अद्यापपर्यंत ही माहिती शिक्षण विभागाकडे पाठविली नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील जवळपास ८२ शाळांनी त्यांच्या संचमान्यतेसंबंधीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. संचमान्यतेच्या प्रस्तावामध्ये काही त्रृटी असून, त्या दुरुस्त केल्यानंतरच शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये यावर्षी १२५ च्यावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. तसेच शाळांमधील ७0 ते ८0 जागा रिक्त असणार असून, या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. २५ मे रोजी पुणे येथे संचमान्यता दुरुस्ती शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये अनेक शाळांच्या संचमान्यतेचे प्रस्ताव दुरुस्त करण्यात येतील. अतिरिक्त ठरण्याची शिक्षकांना भीती२0१६ व १७ ची नवीन संचमान्यतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, या प्रक्रियेदरम्यान शाळांमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची आॅनलाइन माहिती मागविण्यात येणार आहे. त्यांची प्रतीक्षा यादी सेवाज्येष्ठतेनुसार तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या यादीत अतिरिक्त शिक्षक म्हणून आपला नंबर लागतो की काय, अशी भीती शिक्षकांना वाटत आहे. गतवर्षी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनाची प्रतीक्षागतवर्षी जिल्ह्यात ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील सात शिक्षकांचे समायोजन झाले नाही. त्यामुळे त्यांना मूळ शाळेत पाठवून त्यांचे वेतन काढण्यात येत आहे. यंदाच्या शिक्षक समायोजन प्रक्रियेदरम्यान आम्हा अतिरिक्त शिक्षकांचे शाळांमध्ये समायोजन करावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.संचमान्यता दुरुस्त झाल्यानंतर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात १२५ च्यावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी