शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तिळाचा गोडवा कमी होणार!

By admin | Updated: December 26, 2014 01:23 IST

लागवडीचे क्षेत्र घटल्याचा परिणाम.

अकोला : मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणाला तीळ व गुळाच्या लाडूचे व इतर पदार्थांचे अधिक महत्त्व असते. तथापि, बाजारपेठेत तिळाची आवकच कमी असल्याने संक्रांतीपूर्वीच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीला तिळाचा गोडवा कमी होणार असल्याचे संकेत आहेत.विदर्भात तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. कापूस आणि ज्वारीच्या पिकास आंतरपीक म्हणून तिळाचे उत्पादन घेणारा शेतकरी आता सोयाबीनच्या पेर्‍याकडे वळला आहे. तेलबीयांना सातत्याने मिळत असलेल्या कमी भावामुळे यंदा विदर्भातील तीळ लागवडीचे क्षेत्र केवळ ९४00 हेक्टरवर येऊन थांबले. हेक्टरी उत्पादनही ३.७७ क्विंटलपर्यंत खाली घसरल्याने बाजारपेठेत तिळाची आवक यंदा कमी आहे. परिणामी मकर संक्रांतीला अद्याप तीन आठवडे अवकाश असताना कृषिउत्पन्न बाजार समितीत तीळ प्रतिक्विंटल १२३00 रुपये आणि किरकोळ दर १२0 ते १५0 रुपये प्रतिकिलोपर्यंत येऊन पोहोचला आहे. मकरसंक्रांतीपर्यंत या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत धान्य व्यापारी दिनेश राठी यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातच तिळाचे उत्पादन कमी असल्याने अकोल्यातील व्यापारी आंध्र आणि कर्नाटकमधून तीळ मागवित असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.काळा आणि पांढरा अशा दोन सहज ओळखल्या जाणार्‍या तिळाच्या जाती असून, खरीप आणि रब्बी अशी दोन पिके तिळाची घेतली जातात. ऑलिव्ह ऑइलप्रमाणे गुणधर्म असल्याने तीळाचा उपयोग आरोग्य संवर्धनासाठीदेखील केला जातो. मुख्यत्वेकरून पांढर्‍या तिळाचा उपयोग मिठाई निर्मितीसाठी केला जातो, तर साबण, अत्तर व इतर गोष्टींसाठी काळय़ा तिळाचे तेल वापरले जाते. यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे बहुतांश विदर्भातील शेतकर्‍यांनी तिळाची लागावडच केली नाही. अनेक कास्तकारांना फटका बसला आहे. परिणास्वरूप डिसेंबर, जानेवारीमध्ये बाजार समित्यांमध्ये दाखल होणार्‍या तिळाची आवक घटली असल्याची माहिती ज्येष्ठ तेलबिया संशोधक डॉ. एस. एन. देशमुख यांनी दिली.