शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या बँक खाते क्रमांकामुळे शिष्यवृत्ती मिळेना!

By admin | Updated: December 7, 2015 02:30 IST

बँक खाते क्रमांकामध्ये त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा.

अकोला : ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार्‍या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांंना राष्ट्रीयीकृत बँक खाते क्रमांक देणे अनिवार्य असते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांंनी दिलेल्या बँक खाते क्रमांकामध्ये त्रुटी असल्याने या विद्यार्थ्यांंना अद्यापही शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, या अनुषंगाने संबंधित शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांंचे सुधारित बँक खाते क्रमांक समाजकल्याण विभागाला सादर करण्यासाठी २0 डिसेंबरपर्यंंत मुदत देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांंना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परीक्षा फी शैक्षणिक सत्र २0१0-११ पासून ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे. समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत २0१0-११ ते २0१४-१५ या कालावधीत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. परंतु, यातील अनेक विद्यार्थ्यांंचे खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड चुकीचा असल्याने किंवा इतर चुकांमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. या संदर्भात संबंधित महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही चुकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती मिळावी, या अनुषंगाने संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांंचे खाते क्रमांक दुरुस्ती तसेच शिष्यवृत्ती अर्जातील इतर चुकांची दुरुस्ती करून समाजकल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. यासाठी २0 डिसेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली आहे.