शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कामगार महिलांची पोलिसांना धक्काबुक्की

By admin | Updated: July 7, 2014 23:50 IST

कामगार कल्याण कार्यालयातील घटना

वाशिम : येथील कामगार कार्यालयामध्ये घरकाम करणार्‍या महिलांची शासकीय अनुदान मिळण्याकरीता नोंदणी सुरू आहे. या नोंदणीसाठी गर्दी झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. या बंदोबस्तामधील एका महिला पोलिस शिपायासोबत एका मोलकरीण महिलेची आज ७ जुलै रोजी हातापायी झाली. सदर महिलेविरूध्द शहर पोलिस स्टेशनमध्ये शांततेचा भंग केल्याची कारवाई करण्यात आली. सिव्हील लाईन परिसरात असलेल्या कामगार कार्यालयामध्ये गेल्या महिनाभरापासुन घरकाम करणार्‍या महिलांनी नोंदणीसाठी गर्दी केली आहे. दिवसेंदिवस महिलांची गर्दी वाढत असल्याने कामगार कार्यालयाने पोलिस बंदोबस्त मागितला होता. या बंदोबस्तामध्ये दोन पुरूष पोलिस शिपाई व दोन महिला पोलिस शिपायांचा समावेश आहे. आज ७ जुलै रोजी दुपारचे सुमारास महिलांनी लोटलाट करून गोंधळ केला होता. महिलांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी महिलांना रांगेत लागण्यासाठी विनंती केली. मात्र, काही महिलांनी महिला पोलिसांवरच हल्ला चढविला. यामध्ये एका महिला पोलिस शिपायाला जऊळका येथील एका महिलेने सौम्य मारहाण केली. या घटनेमुळे कामगार कार्यालय परिसरामध्ये काही वेळेसाठी तणावपुर्ण वातावरण तयार झाले होते. जऊळका येथील महिलेविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये शांततेचा भंग केल्याप्रकरणी कलम ११0 अंतर्गत कारवाई करण्यात आली.