शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानात्मक परिस्थितीत निष्ठेने काम करा!

By admin | Updated: October 12, 2015 01:53 IST

प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळय़ात जिल्हाधिका-यांचे अवाहन.

अकोला: पोलिसांनी 'सदरक्षणाय व खलनिग्रहनाय' हे ब्रीदवाक्य सतत आचरणात ठेवून पोलीस खात्यातील अवघड व आव्हानात्मक परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाच्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रातातील ५८ व्या सत्रातील ५५२ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यासह व्यासपीठावर प्राचार्य विजयकांत सागर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलिसांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांचा दीक्षांत संचलन सोहळा घेण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रशिक्षणा र्थींच्या परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड कमांडर अय्याजखान पठाण व रघुनाथ होळकर यांच्या नेतृत्वात शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. यावेळी प्राचार्य विजयकांत सागर यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत २३ हजार १८३ प्रशिक्षणार्थी पोलिसांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती देऊन ५८ व्या सत्राचा निकाल ९६.७४ टक्के लागला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य विजयकांत सागर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर उज्‍जवला देशमुख, आयुक्त अजय लहाने यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना मार्गदर्शन केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी विनोद लिंबराज पाटोळे यांच्यासह १३ प्रशिक्षणार्थी पोलिसांना जिल्हाधिकार्‍यांचे हस्ते गौरविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक देवकी उइके, एस. बी. पुजारी, विधी निदेशक भुतडा, खंडारे, शैलेश तायडे व वैभव दाते यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार उप प्राचार्य डी. एस. महाजन यांनी मानले.