शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा कार्ड’ची खेळी यशस्वी ठरणार का?

By admin | Updated: December 23, 2015 02:42 IST

विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी; युतीसाठी प्रतिष्ठेची लढाई.

आशिष गावंडे/अकोला: विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ दंड थोपटून उभे आहेत. विद्यमान आमदारांना आव्हान देण्यासाठी आघाडीच्यावतीने ह्यमराठा कार्डह्ण समोर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शिवसेना व भाजपमधील मराठा-बहुजन लोकप्रतिनिधींचा वरचष्मा लक्षात घेता, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा कार्डची खेळी कितपत यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया तिसर्‍यांदा निवडणूक लढवत असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा उमेदवार म्हणून रवींद्र सपकाळ यांना मैदानात उतरविले. बाजोरिया मागील बारा वर्षांपासून अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्वायत्त संस्थांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून कोसोदूर नेऊन ठेवले. हा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चटका देणारा ठरला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील मराठा मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसने विचारपूर्वक मराठा समाजाचा उमेदवाराला मैदानात उतरविले आणि प्रचारादरम्यानही मराठा कार्डचाच वापर केला जात आहे.विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात येणार्‍या तिन्ही जिल्ह्यात शिवसेना-भाजप पक्षांचे खासदार संजय धोत्रे, राज्याचे नगरविकास मंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव तसेच वाशिम जिल्ह्यातील खासदार भावना गवळी या मराठा समाजातील आहेत. त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक युतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.