शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात पांढ-या सोन्याची पिछेहाट!

By admin | Updated: July 19, 2016 00:31 IST

कडधान्याच्या क्षेत्रात भर झाली असून खरीप हंगामात दोन लाख हेक्टरची घट झाली आहे.

अकोला : कधीकाळी पश्‍चिम विदर्भाचे (वर्‍हाड)पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस या नगदी पिकाला ओहोटी लागली असून, यावर्षीच्या खरीप हंगामात हे क्षेत्र दोन लाख हेक्टरने कमी झाले आहे. कडधान्याच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली असून, तूर ७७ तर उडिदाचे क्षेत्र १0 हजार हेक्टरने वाढले आहे. सोयाबीनने तर यावर्षी १३ लाख ७६ हजार हेक्टरपर्यंत उच्चांकीचा आकडा गाठला आहे. दरम्यान, यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने युरिया खताच्या मागणीत वाढ झाली आहे.वर्‍हाडात ३२ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे असून, आतापर्यंत ९३ टक्के म्हणजेच ३0 लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.पाऊस वेळेवर व पूरक झाल्याने शेतकर्‍यांनी यावर्षी सोयाबीनची विक्रमी म्हणजेच आतापर्यंत १३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. तसे बघितल्यास सोयाबीनचे या भागातील सरासरी क्षेत्र हे १२ लाख ६८ हजार आहे, तर या भागाची ओळख असलेल्या पांढर्‍या सोन्याची मात्र दरवर्षी पिछेहाट सुरू असून, यावर्षी तर हे क्षेत्र २ लाख २७ हजार हेक्टरने कमी झाले आहे. यावर्षी सरासरी १0 लाख ८७ लाख हेक्टर हवे होते ते क्षेत्र आजमितीस ८.६0 लाख हेक्टरच आहे. कडधान्याचे क्षेत्र मात्र वाढले असूून, तुरीचे क्षेत्र या भागात ४ लाख हेक्टर होते, यामध्ये ७७ हजाराची वाढ झाली आहे. उडीद ८६ हजार क्षेत्र आहे. यावर्षी ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली.४७ हजार मेट्रिक टन युरिया सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पिवळी पडल्याने युरियाची मागणी वाढली असून, ४७ हजार मेट्रिक टन निमकोटेड युरियाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.