शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोट-नांदेडदरम्यान रेल्वे सेवाला ग्रीन सिग्नल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम ...

उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. या मीटरगेज रूपांतरणाच्या कामात अकोला ते अकोटदरम्यान रूपांतरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१९ मध्ये रेल्वेमार्गाची पाहणी केल्यानंतर रेल्वे विभागाने १९ मे २०१९ रोजी वेगात इंजिन चालवून ट्रॅकच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती. ज्यामध्ये रेल्वेमार्ग वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा विभागाकडूनही देण्यात आले होते. सुरक्षा विभागाने वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर नियमांनुसार पहिल्या टप्प्यात अकोट ते अकोलादरम्यान मालगाड्या धावू लागल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला ते अकोटदरम्यान अनेक मालगाड्यांची ये-जा झाली. मात्र दोन वर्षांपासून केवळ मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरू असून, दक्षिण मध्य रेल्वेने आजवर प्रवासी गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे अकोला ते अकोटमार्गे तुकईथळ, अमला खुर्द अशा १४ रेल्वेस्थानकांवर एकंदरीत प्रवास करणाऱ्या सुमारे दहा लाख रेल्वे प्रवासी गेल्या चार वर्षांपासून प्रवासी गाड्यांपासून वंचित राहिले आहेत. अकोला-खंडवा मीटरगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून अकोला ते खंडवादरम्यानची रेल्वे वाहतूक बंद होती.

गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात

अकोला ते खंडवादरम्यान १७४ किमीचे गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जात आहे. या मार्गावर खंडवा ते अमला खुर्ददरम्यान ५३ किमी आणि अमला खुर्द ते अकोटदरम्यान ७७ किमी प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते अकोटदरम्यान ४४.७९ किमीचे गेज रूपांतरण झाले होते. रेल्वे सुरक्षा विभागाने दोन वर्षांपूर्वी सुरक्षा तपासणी केली आणि सुरक्षा प्रमाणपत्रही दिले. तेव्हापासून बऱ्याच मालगाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासी रेल्वे नसल्याने दहा लाख नागरिक प्रवासापासून वंचित राहिले आहेत.

रेल्वे सुरू करा

अकोला रेल्वेस्थानकात अनेक गाड्या थांबतात. ज्यामध्ये अकोला आणि अकोला-काचीगुडा इंटरसिटीकडे जाणारे प्रवासी अकोटपर्यंत सहज नेता येतात. शिवाय अकोटहुन अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेडपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू करण्याची मागणी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, विजय जितकर, रामदास काळे, लकी इंगळे, विजय शिंदे, मुकुंद कोरडे, मंगेश लोणकर, विजय जितकर यांच्यासह अमोल इंगळे, ठाकूर, गोयनका, वाशिम येथील डीआरयूसीसी सदस्य गुलाटी, जुगलकिशोर कोठारी, हिंगोली येथील राकेश भट, शोएब वासेसा, स. रियाज आदींनी यापूर्वीच केली आहे,

केंद्रात मंत्री असूनही रेल्वे सुरू नाही!

अकोट-अकोला दरम्यानचा संपूर्ण रेल्वेमार्ग अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. संजय धोत्रे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. या रेल्वेमार्गाकरिता त्यांचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या क्षेत्रात अकोट ते अकोलादरम्यान साधी रेल्वे सुरू करणे कठीण काम नाही. तसेच अकोट येथून रेल्वे सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

चौकट...

प्रवासी रेल्वे एक महिन्यामध्ये सुरू करा : विजय जितकर

दोन वर्षांपासून अकोट-अकोला गेज बदलण्यात आले आहे. चार वर्षांपासून अकोट व त्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक शेकडो गावे गाड्यांपासून वंचित राहिली आहेत, रोजगार व व्यवसाय ठप्प झाला आहे. आता गेज बदलण्यात आले आहे, त्यामुळे एससीआरने अकोलापर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या अकोटपर्यंत कराव्यात तथा अकोट ते नांदेडला जाण्यासाठी नवीन प्रवासी अशी मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा समाजसेवक विजय जितकर यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेगाडी चालविण्यास एससीआरने सुरुवात करावी. एका महिन्यात ही मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विजय जितकर यांनी दिला.

चौकट.....

पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अकोला-अकोट रोड नेहमी बंद पडतो. शिवाय या रोडचे काम संथगतीने सुरू आहे. या रोडवर अपघाताची मालिका सुरू असून, अनेकांचे जीव जात आहेत. अशा जीवघेणा स्थितीत रेल्वेसेवा सुरू होणे अत्यावश्यक आहे.