शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पतंग उडवताना वीज यंत्रणेपासून राहा चार हात लांब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटण्यात आली असून, दिवसेंदिवस आकाशातही ...

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटण्यात आली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघू व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सळई किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन जीवावर बेतू शकते. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे प्राणांकित अपघात होऊ शकतो.

प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा अस्तित्वात आहे. वीज वाहिन्यांच्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व या वेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. नागरिक व लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानांत पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

धातूमिश्रित मांजा धोकादायक

बाजारामध्ये धातूमिश्रित मांजा मिळतो. दोऱ्यावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच या मांजामुळे अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही.

पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगावी.

- फुलसिंग राठोड,

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण अकोला परिमंडळ