शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पश्‍चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती!

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

आनंद सागर येथे साडेतीन कोटी पर्यटकांनी घेतला आनंद.

गजानन कलोरे / शेगाव (जि. बुलडाणा)येथील आनंद सागरची ख्याती पश्‍चिम वर्‍हाडासोबतच सर्वदूर पोहोचली आहे. भक्ती, मनशांती आणि पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने या ठिकाणी येणार्‍यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. स्वत:शीच स्पर्धा करीत आनंद सागर आपल्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढत आहे. विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच भाविकांना आनंद सागरची सहल होते.श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिल १९९९ साली आनंद सागरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला १२0 एकराच्या पहिल्या भागातील कामास सुरुवात करण्यात आली, तसेच आनंद सागरच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर आकर्षक देखावे, तसेच समाजासाठी झटलेल्या, जगाचा उद्धार करणार्‍या १८ संतांच्या मूर्तीही येथे विराजमान करण्यात आल्या. आनंद सागरच्या निर्मितीसाठी राजस्थान येथील मार्बल आणि सॅन स्टोनचा वापर करण्यात आला, तसेच दोन लाख २0 हजार वृक्षांची लागवड करून हिरवळ जोपासण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर १२-१२-२00२ रोजी पहिल्या भागाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १६ जानेवारी २00३ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर पहिल्यावर्षी महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील ३0 लाख भाविकांनी आनंद सागरला भेट दिली. तेरा वर्षांच्या कालावधीत ३0 लाखांच्या संख्येने सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पर्यटनाचा आनंद लुटला आहे.मान्यवरांच्या भेटी!पश्‍चिम विदर्भाचे नंदनवन असलेल्या आनंद सागरला मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही भेट देतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनीही भेट दिली आहे.राजस्थानी शैलीचे प्रवेशद्वार!आनंद सागरचे प्रवेशद्वार राजस्थानी शैलीची आठवण करून देणारे असून, आध्यात्मिक मन:शांतीसाठी ध्यान मंडप, मत्स्यालय, झुलता पूल, खुला रंगमंच, संगीताच्या आधारावर जलधारा, आनंद सागरची सैर करणारी रेल्वे आदी आनंद सागरची वैशिष्टे आहेत.