शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

फळ विक्रेत्यांची वजनात ‘दांडी

By admin | Updated: October 3, 2014 01:24 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशन: एक किलो विकत घेतल्यास मिळते ७५0 ग्रॅम फळं.

सचिन राऊत/प्रवीण ठाकरे /अकोलाजनता भाजी बाजारातील फळ विक्रेते वगळता भाजी बाजारासमोरील व शहराच्या छोट्या बाजार पेठेतील फळ विक्रेते एक किलो फळामागील वजनात तब्बल २00 ते २५0 ग्रॅम दांडी मारीत असल्याचे उघडकीस आले. ह्यलोकमतह्णने गुरुवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.जनता भाजी बाजार फळांची मोठी बाजारपेठ आहे. या व्यतिरिक्त जठारपेठ, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड व जनता भाजी बाजारासमोरील भिंतीलगत तसेच श्रीकृष्ण द्वार आणि श्रीराम द्वार परिसरातून फळांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. जनता भाजी बाजार वगळता भाजी बाजारासमोरील फळ विक्रेते, सिंधी कॅम्प व जठारपेठ तसेच श्रीकृ ष्ण आणि श्रीराम द्वारासमोरील फळ विक्रेते वजनात दांडी मारीत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. जनता भाजी बाजारातून एक किलो सफरचंद विकत घेतले. त्यानंतर हेच सफरचंद इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रावर मोजले असता त्यात किरोकळ फरक आढळून आला. त्यानंतर जनता भाजी बाजारासमोरील फळ विक्रेत्यांकडून एक किलो सफरचंद घेऊन ते मोजले असता, ते तब्बल २७0 ग्रॅम कमी भरले. सिंधी कॅम्पमधील फळ विक्रेत्यांकडून फळ घेतल्यानंतर वजन केले असता त्यात १६0 ग्रॅम कमी वजन आढळून आले. जठारपेठ परिसरातील फळ विक्रेत्यांकडून विकत घेतलेल्या फळांमध्ये ५0 ते ६0 ग्रॅम वजन कमी आढळून आले. त्यामुळे जनता भाजी बाजार वगळता इतर ठिकाणचे फळ विक्रेते ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले.