शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही घाबरत नाही, महिलांचा सन्मान करताे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या आठव्या दिवसापासून निमा अराेरा यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक व ...

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या आठव्या दिवसापासून निमा अराेरा यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक व फेरिवाल्यांविराेधात कारवाईचा बडगा उगारला आहे. लघु व्यावसायिकांना खुले नाट्यगृह व भाटेक्लब मागे पर्यायी जागा दिल्यानंतरही याठिकाणी जाण्यास व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. यादरम्यान, भाजीपाला, फळविक्रेता तसेच लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड व नासधूस करून त्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. या मुद्यावर शुक्रवारी सायंकाळी विराेधी पक्षनेता साजीद खान यांनी आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा दिली. यावेळेतही मनपाकडून कारवाई हाेत असेल तर गरीब लघु व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचे साजीद खान यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल रहेमान व नगरसेवक उपस्थित हाेते.

गटनेत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष का ?

काेराेना काळात जीव धाेक्यात घालून आराेग्य सेवा निभावणाऱ्या डाॅ. सय्यद वासीक अली यांना तुम्ही तडकाफडकी सेवेतून कमी केले. काॅंग्रेस व सेनेच्या गटनेत्यांसह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला कारवाई मागे घेण्याची विनंती केली. उद्या भविष्यात तुमच्याकडूनही प्रशासकीय चूक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी शासनाकडे तक्रारी करणे हा पर्याय नाही. गटनेत्यांच्या सूचनांकडे तुम्ही दुर्लक्ष करता,ही बाब याेग्य नसल्याचे साजीद खान म्हणाले.

काेराेनाच्या संकट काळात लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड करणे याेग्य नाही. मनपाच्या अतिरेकी कारवाईमुळेच शुक्रवारी स्वस्तिक चहाच्या दुकानासमाेर फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यावर आत्महत्येची वेळ ओढवल्याचे समाेर आले आहे. प्रशासनाने संयम ठेवावा, अशी आयुक्तांकडे विनंती केली.

-साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा