शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

पारशी समाजाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 18, 2014 01:44 IST

केवळ उरली तीन कुटुंब ; पारशी नवीन वर्ष विशेष

नितीन गव्हाळे / अकोलापारशी माणूस म्हटला की आर्थिकदृष्ट्या सधन. ज्याही ठिकाणी पारशी समाज वास्तव्यास गेला. त्या ठिकाणी पारशी समाजाने त्या शहराच्या विकासाला हातभार लावला. अकोल्यासारख्या शहराच्या विकासामध्येही पारशी समाजाने हातभार लावला. उद्योग, व्यापाराच्या माध्यमातून अकोला शहरात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या पारशी समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कधीकाळी १00 च्या जवळपास संख्या असलेल्या पारशी समाजाची आजमितीस शहरात केवळ तीन कुटुंब उरली आहेत. सोमवारपासून पारशी नवीन वर्षाला सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने शहरातील पारशी समाजाच्या योगदानाचा, त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णने केला. १0 च्या दशकामध्ये इराणमधील पारशी उर्फ झरथुष्ट्र धर्माचे लोक अरबी आक्रमकांच्या अत्याचाराला त्रासून भारतामध्ये आले. गुजरातसोबतच देशातील इतर राज्यांमध्ये दुधात साखर मिसळावी तसा हा समाज तेथील संस्कृतीशी समरस झाला. अकोल्यासारख्या शहरामध्येही १८७0-८0 च्या काळात पारशी समाजातील काही कुटुंब स्थायिक झाली. उद्योग व व्यापाराच्या माध्यमातून पारशी समाजाने अल्पावधीतच शहरात स्वत:ची ओळख निर्माण केली; परंतु वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक पारशी कुटुंबाने आपले खासगीपण जपले. त्यांच्या अग्यारीत अन्य धर्मियांना प्रवेश दिला जात नसल्याने या समाजाविषयी अन्य समाजाच्या मनात आदर आणि परकेपणाची भावनाही निर्माण झाली. आजमितीस तर पारशी समाज पूर्णत: परका होतो की काय, अशी खंत व्यक्त होऊ लागली. *१९३८ च्या काळात उभारली अग्यारीअग्यारी हे पारशी समाजाचे प्रार्थनास्थळ आहे. १९३८ च्या काळात शहरात पारशी समाजाने पंचायत समितीसमोर अग्यारी उभारली. ही अग्यारी पश्‍चिम विदर्भात एकमेव आहे. एकेकाळी पतेतीला या अग्यारीमध्ये चांगलीच वर्दळ पाहायला मिळायची; परंतु पारशींची संख्या कमी झाल्याने या अग्यारीमध्ये फारसं कुणी दिसत नाही. पारशी अग्यारी अस्तित्वाचं प्रतीक म्हणून उभी आहे. *१९0१ मध्ये शहरात होते ८३ पारशी१९0१ च्या काळात शहरामध्ये राहणार्‍या पारशींची संख्या ८३ होत; परंतु ती घटून केवळ १३ वर आली आहे. त्यामागची कारणे वेगवेगळी आहेत. शहरातील काही कुटुंबे शिक्षण, व्यापाराच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित झाली. काही लोक मरण पावले. त्यामुळेच की काय? पारशींची संख्या शहरात बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे.