शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

५५ गावांना टँकरने पाणीपुरवठय़ाचाही वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:37 IST

अकोला : जिल्ह्यात दमदार पावसाचा अद्याप पत्ता नाही. पिके हातची जात आहेत. त्याचवेळी येत्या दहा महिन्यांतील पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवणार, या विवंचनेत आता शासन, प्रशासन आहे. वान धरणातील साठा, त्यातून होणारा पुरवठा, तसेच १५ लघू प्रकल्प अद्यापही कोरडे असल्याने येत्या काळातील पाणीटंचाईला कसे तोंड देणार, या विचाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रशासनाची बैठक बोलावली आहे. 

ठळक मुद्देखांबोरा योजनेतील गावांसाठी पाणी कोठून आणणार टंचाईतील दहा महिन्यांसाठी नियोजनाची बैठक

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात दमदार पावसाचा अद्याप पत्ता नाही. पिके हातची जात आहेत. त्याचवेळी येत्या दहा महिन्यांतील पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवणार, या विवंचनेत आता शासन, प्रशासन आहे. वान धरणातील साठा, त्यातून होणारा पुरवठा, तसेच १५ लघू प्रकल्प अद्यापही कोरडे असल्याने येत्या काळातील पाणीटंचाईला कसे तोंड देणार, या विचाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रशासनाची बैठक बोलावली आहे. खारपाणपट्टय़ातील ५५ गावांसाठी जीवनवाहिनीअसलेली ६४ खेडी पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी बाजूला ठेवला आहे. पुरवठा होणार्‍या पाण्यापेक्षा नासाडी प्रचंड असल्याचे कारण त्यामागे आहे. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. त्यावर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठय़ाचा प्रस्तावही आहे. मात्र, टँकरने पुरवठय़ासाठी पाण्याचा स्रोत कोणता वापरावा, ही समस्या त्यापेक्षाही मोठी आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंटसची सोय नाही. 

१५ लघुप्रकल्पातील साठा शून्यावरजिल्ह्यातील २७ पैकी १२ लघुप्रकल्पात नाममात्र पाणीसाठा आहे, तर १५ प्रकल्पात तो शून्य आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील बोरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, सुकळी, अकोट तालुक्यातील शहापूर बृहत, चिचपाणी, भिलखेड, धारूर, मूर्तिजापूर तालुक्यातील पिंपळशेंडा, बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, जनुना, घोटा, झोडगा, मोर्‍हळ, हातोला, पातूर तालुक्यातील सावरगाव बाजार, गावंडगाव, विश्‍वमित्री, बाळापूर तालुक्यातील कसुरा कोल्हापुरी बंधारा, तामशी कोल्हापुरी बंधार्‍याचा समावेश आहे. काही नाममात्र साठा असलेले प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यातील शिवण खुर्द, पातूर तालुक्यातील हिवरा, झरंडी संग्राहक, तुळजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यातील घोंगा, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, सावरखेड, इसापूर, मोझरी, कानडी प्रकल्प आहेत. 

‘६४ खेडी’ बंद पडल्याने टँकरग्रस्त गावे६४ खेडी योजना बंद पडल्याने ५५ गावांना टँकरने पुरवठय़ाचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुल्तान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द या गावांचा समावेश आहे. दरडोई २0 लीटरप्रमाणे पाणीपुरवठय़ाची सोय टँकरद्वारे करावी लागणार आहे. 

‘वान’च्या पाण्यासाठी वाटेकरी वाढले!गेल्यावर्षी योजनेतील ५५ गावांना वान प्रकल्पाच्या देवरी फाटा आणि चोहोट्टा येथील व्हॉल्ववरून टँकरमध्ये पाणी घेण्यात आले. यावर्षी वानचे पाणी मिळते की नाही, ही समस्या आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील साठा पाहता या गावांना पाणी मिळणे अशक्य आहे. त्या प्रकल्पावर अकोट शहर अधिक ८४ खेडी योजना, तेल्हारा शहर, शेगाव शहर अधिक संस्थान, जळगाव जामोद शहर, संग्रामपूर अधिक १४४ खेडी योजनेतील गावे अवलंबून आहेत. 

४३ टक्के साठय़ावर दहा महिन्यांचे नियोजनसद्यस्थितीत प्रकल्पात उपयुक्त ४३ टक्के जलसाठा आहे. यापुढे पाऊस न आल्यास या साठय़ातून दहा महिने पुरवठय़ाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे ५५ गावांना दैनंदिन २६ टँकर्सद्वारे लागणारे पाणी प्रकल्पातून आतापासून दिल्यास भविष्यातील समस्येचे काय, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

मोठे व मध्यम प्रकल्पांनी गाठला तळमोठे प्रकल्प असलेल्या वानमध्ये ४३, तर काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १५.३४ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्प मोर्णामध्ये ६.९२, निगरुणा-४.६१, उमा-0.१0 टक्के पाणीसाठा आहे. या तीन प्रकल्पाच्या क्षेत्रात आतापर्यंत अनुक्रमे ३२२, २६२, २५0 मिमी पावसाची नोंद आहे.