शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण यंत्र पुरवठादाराचा जिल्हा परिषदेला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST

अकोला: पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये बसवलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांपैकी आठ गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही सयंत्रे बसवण्यात आली, तोच असफल होत असल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. विशेष म्हणजे, ज्या पुरवठादाराने ही सयंत्रे बसवली, त्याच्याकडून जिल्हा परिषदेला कुठलीही दाद दिली जात नसल्याचाही प्रकार घडत आहे.

ठळक मुद्देआठ गावांतील शुद्धीकरण संयंत्रे बंद दोन गावांत मागणीच नाही!

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये बसवलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांपैकी आठ गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही सयंत्रे बसवण्यात आली, तोच असफल होत असल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. विशेष म्हणजे, ज्या पुरवठादाराने ही सयंत्रे बसवली, त्याच्याकडून जिल्हा परिषदेला कुठलीही दाद दिली जात नसल्याचाही प्रकार घडत आहे.राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्हय़ातील २0 गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे मंजूर करण्यात आली. ती यंत्रे बसवताना त्या गावातील पाणी गुणवत्ता बाधित असल्याचा निकष लावण्यात आला; मात्र पाण्याचे स्रोत बाधित असतानाही या शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी ग्रामस्थांची मागणीच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या गावात जलशुद्धीकरण सयंत्रांसाठी झालेला खर्च पाण्यात गेला आहे. त्या गावांमध्ये सुरू असलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता सहाय्य कक्षाने जिल्हा परिषदेकडून मागवला आहे. त्यामध्ये आठ गावांतील सयंत्रे बंद असल्याचे उघड झाले. त्यातच त्यासंदर्भात संबंधित पुरवठादाराशी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संपर्क केला असता तो जुमानत नसल्याचाही प्रकार घडत आहे. 

टिटवा, दगडपारव्यात मागणीच नाही!पाणीस्रोत दूषित असल्याने ज्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली, त्या गावात शुद्ध पाण्याचा वापर ग्रामस्थांनी करावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली; मात्र गावात जलशुद्धीकरण यंत्र असतानाही त्यातील पाणी दोन गावातील ग्रामस्थ वापरतच नसल्याचे आढाव्यात पुढे आले. त्यामध्ये बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा आणि टिटवा या दोन गावांचा समावेश आहे. दगडपारवा येथील पुरवठा मे २0१६ पासून बंद आहे. तर टिटवा येथे सुरुवातीपासूनच बंद आहे.

जलशुद्धीकरण सयंत्र बंद असलेली गावेग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी असलेली जलशुद्धीकरण सयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील एरंडा येथे स्रोतातच पाणी नसल्याने शुद्धीकरण बंद आहे. घोटा येथे वीज जोडणीअभावी सयंत्र अद्यापही कार्यान्वित झाले नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद आहे. उमरी येथे अद्यापही पुरवठा सुरू झाला नाही. बोरगाव मंजू येथे थकीत देयकामुळे बंद आहे. कुरणखेड येथे बोअरला पाणी नाही. 

दहा ते २५ पैसे लीटरने पुरवठाग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण सयंत्रे आहेत. ग्रामपंचायतींच्या देखरेखीखाली ती चालवली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये दहा पैसे लीटर तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लीटरप्रमाणे शुल्क घेतले जाते. 

पाणीपुरवठा सुरू असलेली गावेपाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील अंबिकापूर, म्हैसांग, पैलपाडा, वडद बुद्रूक, बाळापूर तालुक्यातील गायगाव, वझेगाव, बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप, वडगाव, मूर्तिजापूर तालुक्यातील आरखेड, दातवी, कंझरा, खापरवाडा ही गावे आहेत.-