शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पाणी फाऊंडेशनमुळे रेशीम शेती प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलणार!

By admin | Updated: April 28, 2017 11:32 IST

गत 16 वर्षापासुन पाण्याअभावी बंद पडलेला कोट्यावधी रुपयांचा केंद्रीय रेशीम बोर्डाचा प्रकल्प पाणी फाऊंडेशनच्या विशेष प्रयत्नानी कार्यान्वीत होणार आहे.

शिर्ला (अकोला) : गत 16 वर्षापासुन पाण्याअभावी बंद पडलेला कोट्यावधी रुपयांचा केंद्रीय रेशीम बोर्डाचा प्रकल्प पाणी फाऊंडेशनच्या विशेष प्रयत्नानी कार्यान्वीत होणार आहे. केंद्र सरकारच्या रेशीम बोर्डाने विदर्भातील शेतकरी पारंपरिक पीक पध्दतीने खचुन गेल्याने नविन शाश्वत ऊत्पन्न स्त्रोताचा रेशीम शेतीचा पर्याय देण्यासाठी अकोला जिल्हय़ातील शिर्ला येथे चीन_भारत आपसी सामंजस्य करारानुसार कोट्यवधी खर्चून रेशीम शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले. रेशीम शेती विस्ताराची प्रचार प्रसाराची प्रकिया चार वर्षे जोमाने चालली. शेतकरी रेशीम शेतीकडे वळु लागले. मात्र अचानक भुगर्भातील जलसाठा कमी झाला आणी रेशीम प्रकल्प पाणी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला. अल्पावधीतच प्रकल्पाची वाताहत झाली. अखेर हा प्रकल्प तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती येथे हलविला. इमारती भग्नावस्थेत गेल्या आणी हे अवशेष राज्य शासनाच्या रेशीम संचालनालयाला करावर चालविण्यास दिले. आधिच पाण्याचे दुर्भिक्ष त्यामुळे ह्यातील शेती क्षेत्र पडिक जमीनीत बहुतांश भाग परावर्तीत झाला. शेतकरी दुर गेला. मात्र गत वर्षी जलयुक्त शिवार योजना आली परीसरात जलसंधारणाची विविध कामे झाली. परिसरात पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली. ह्या वर्षी अमीर खान प्रणीत पाणी फाऊंडेशन आले. शिर्लाच्या युवकांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित युवकांनी सोबत घेउन गावातील सचिन कोकाटे.संतोषकुमार गवई ह्यांनी रेशीम फार्म प्रमुख श्री. झलके ह्यांची भेट घेतली. रेशीम शेतीचे वैभव जलसंधारण विविध ऊपचारातुन कसे आणायचे याची शास्त्रशुध्द योजना मांडली. श्री झलकेनी वरिष्ठाकडुन परवानगी मिळवली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी 8 एप्रिलला शुभारंभासाठी अकोला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत ह्यांना बोलवले. आणि महाश्रमदानाने रेशीम प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली. बघता बघता आता पर्यंत ह्या क्षेत्रावर कंपार्टमेट बंडीग. कंट्रोल बांध. अनघा दगडी बांध. समतल चर.खोल चर.व्हॅट. शेततळे. विहिर पुनर्भरण. आदि. विविध जलसंधारणाचे उपचार ह्या क्षेत्रात करण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षणामूळे गावकरी हा बदल घडवु शकले. परीणामी हा विदर्भाचा रेशीम प्रकल्प शेतकऱ्याना रेशीम शेतीचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा ऊभा राहु शकला.अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या चळवळीमुळे.