शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 02:40 IST

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोल्यात ‘वॉटर रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला, दि. १९- पडणार्‍या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. यासाठी जलजागृती करणे, जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. राज्यात १६ ते २२ मार्च २0१७ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त रविवार, १९ मार्च रोजी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून एका भव्य वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. या वॉटर रनचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. वॉटर रनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका- नवीन बसस्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बसस्थानक -अशोक वाटिका मार्गे अधीक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे समारोप करण्यात आला. या वॉटर रनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोच्या हातात होते. जल है, तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाणी वाचवा देश वाचवा, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण शहर जलजागृतीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत होते. वॉटर रनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी जलजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट परिधान केले असल्यामुळे एक वेगळीच छटा रॅलीला दिसत होती. प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, संचालन अरविंद भोंडे यांनी केले. या वॉटर रनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन जिल्हा माहिती कार्यालय तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.