शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील धरणांचा जलसाठा घसरला!

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

अकोला शहराला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णा धरणात २२ दलघमी जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात झपाट्याने घट होत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ २२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे एकंदर चित्र आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविल्याने येथील धरणांमध्ये अल्प जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी हिवाळा लागला, पण थंडीला प्रत्यक्षात एक ते दीड महिन्यांनी सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आणि जानेवारीच्या प्रथम आठवड्यात थंडीला सुरुवात झाली. जानेवरीत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग काहीसा कमी झाला होता.आता पुन्हा रात्री थंडी आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २२ दलघमी म्हणजे २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बुलडाणा जिलतील नळगंगा धरणामध्ये २९.१0 दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिलतील ज्ञानगंगा प्रकल्पात ५९ टक्के, मस धरणामध्ये ७४ टक्के, कोराडी ५0 टक्के, पलढग या प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिलतील मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणा ६६ टक्के, उमा धरणात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अंभियता विजय लोळे यांनी काटेपूर्णा धरणातून शहर आणि विविध पाणीपुरवठा योजनांना प्रत्येक महिन्याला तीन दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात असल्याचे सांगून त्यानुसार येत्या सहा महिन्यांत १८ दलघमी पाणी लागेल. धरणात आजमितीस २२ दलघमी पाणी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसली तरी काटकसर व काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.