शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात पाणीटंचाईचे संकट !

By admin | Updated: September 7, 2015 23:32 IST

काटेपूर्णा २७ टक्के ; दगडपारवा शून्य, कोराडीत ४ टक्के जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात पुरक पाऊस झाला नसल्याने या विभागात जलसंकट निर्माण आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २७ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा शून्यावर, तर बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात ४ टक्के जलसाठा आहे. यावर्षी पावसाळा संपायला आला तरी पुरक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पात पूरक जलसाठा संकलित झाला नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस २७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आता तर पाऊस नाही आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ३८ टक्के, निगरुणा ४९ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात २८ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ज्ञानगंगा प्रकल्प ४३ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४ टक्के, तर पलढग या प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात ५१ टक्के जलसाठा शिल्लक असून, लोअरपूसमध्ये ८७ टक्के साठा आहे. सायखेडा या प्रकल्पात ९९ टक्के, गोकी ९९ टक्के, वाघाडी ९९ टक्के व बोरगाव या मध्यम प्रकल्पात ८८ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्प पातळीची अवस्था सुधारण्याची शक्यता आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ८६ टक्के तर आकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात ८६.६४ टक्के जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्प जलग्रहण क्षेत्रात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने काटेपूर्णा धरणात आजमितीस २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पात आहे त्या जलसाठय़ाचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले.

*मध्यम प्रकल्प पडले कोरडे

       अकोला जिल्हय़ातील दगडपारवा या धरणाची पातळी शून्य टक्के असून, बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात केवळ ४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. इतर धरणातील पातळी कमी होत आहे.