- राजरत्न सिरसाटअकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यात गत काही वर्षांपासून सतत पावसाची अनिश्चितता वाढल्याने पाणी टंचाईच्या दुर्भीक्ष्याचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात सिंचनावरील शेती करणे कठीण झाले आहे. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता यांनी कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’ अर्थात शेततळे बांधले आहे. या ‘वॉटर बँके’तून पाणी घेऊन यावर्षीच्या उन्हाळ्यात संशोधन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता आली. या तळ््याच्या बांधकामासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांनी जागेचा शोध घेऊन कृषी अभियांत्रिकी परिसराच्या मागील दहा एकर क्षेत्रावरील जागेत हे शेततळे ‘वॉटर बँक’ बांधण्यात आले. जलपुनर्भरण होईल असे हे तळे आहे. २०१६-१७ मध्ये हे तळे बांधण्यात आले. या तळ्यात पाच हजार घनमीटर पाणी साठवणूक क्षमता असून, त्यापेक्षा अधिक जलपुनर्भरणाची क्षमता आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात सर्वत्र पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य निर्माण झाले असताना या तळ्यात अर्थात ‘वॉटर बँक’मधून मोटरद्वारे पाण्याचा उपसा करू न पीएच.डी. व इतर संशोधित पिकांसाठी उन्हाळ्यात हे पाणी वापरण्यात आले; तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली तद्त्त्वच महाविद्यालयासमोरील संशोधन व बगीच्याला पाणी देऊन जगविण्यात आले.या ‘वॉटर बँक’मधून पाणी खेचण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्याला डॉ. नागदेवे यांनी ‘एटीएम’ची संज्ञा दिली आहे. तळ् यापासून एक किलोमीटर जलवाहिनी टाकून हा पाणी पुरवठा करण्यात आला.
अकोल्याच्या कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 16:27 IST