शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय स्वाक्षरीच्या दाखल्यांमध्ये वाशिम तालुका राज्यात अव्वल

By admin | Updated: September 12, 2014 23:17 IST

इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट : १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण

वाशिम : इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टअंतर्गत संगणकीय स्वाक्षरीद्वारे १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण करून, वाशिम तहसील कार्यालय राज्यात संगणकीय कामकाजात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. १0 सप्टेंबर रोजी हा बहुमान वाशिम तालुक्यास घोषित करण्यात आला आहे.संगणकीय प्रणालीचा वापर करून कामकाज ह्यहायटेकह्ण करण्यासाठी राज्यभर इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट १ जानेवारी २0१४ पासून राबविण्यात येत आहे. संगणकीय स्वाक्षरीद्वारे विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकाची पारितोषिक योजनाही सुरू करण्यात आली आहे. त्या योजने अंतर्गत वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले आहे तर धुळे तहसील कार्यालय द्वितीय तर कोल्हापूर तहसील तृतिय क्रमांकावर आहे.वाशिम तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या मार्गदर्शनात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१४ या कालावधीत जवळपास १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण केले. यामध्ये इ-महासेवा केंद्र व सेतुमार्फत आलेले नऊ हजार ३0४ उत्पन्नाचे दाखले, एक हजार ४२९ अधिवास प्रमाणपत्र, ११ ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, १0 जन्म नोंदी आदेश, १0 मृत्यू नोंदी आदेश व ७६ इतर प्रमाणपत्र अशा एकूण १0 हजार ८४0 प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस राज्यस्तरावर संगणकीय कामकाजाचे मूल्यमापन केले असता, यात वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले.