शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वामनदादांचे साहित्य ‘समग्र वामन’ म्हणून प्रकाशित होणार!

By admin | Updated: September 13, 2016 02:46 IST

हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार; वामनदादांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमातही होणार अंतर्भाव!

सिद्धार्थ आराख मेहकर(जि. बुलडाणा), दि. १२: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली समतेची चळवळ घरा-घरात पोहोचविण्यासाठी तसेच बाबासाहेबांचा मानवमुक्तीचा लढा ज्यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मनामनात पेरण्याचे काम केले, असे लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य ह्यसमग्र वामनह्ण म्हणून राज्य शासन प्रकाशित करणार आहे. तसेच लवकरच वामनदादांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमातसुद्धा अंतर्भाव करण्यात येणार आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या कार्यासन अधिकारी वर्षा जोशी यांनी साहित्य व संस्कृती मंडळाला तसे पत्र देऊन उचित कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. देशातील शोषित, पीडित, मागास समाजाला समानतेची वागणूक मिळावी, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा लढा उभा केला. तत्कालीन परिस्थितीत लोककवी वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही सामाजिक चळवळ लोकरंजनातून समाज प्रबोधन करीत महाराष्ट्राच्या घरा-घरात व लोकांच्या मना-मनात पेरण्याचे काम केले. लोकांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला. आजही लोककवी वामनदादा कर्डक यांचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य अप्रकाशित आहे. माणसा -माणसाच्या मनातील विषमतेची दरी दूर करण्याचे काम हे साहित्य आजही किती उपयुक्त आहे, हे हेरून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य शासनाकडे लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य ह्यसमग्र वामनह्ण नावाने प्रकाशित करण्याची मागणी केली होती. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या मराठी भाषा विभागाने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाला पत्र लिहून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीनुसार वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य समग्र वामन म्हणून शासनाच्यावतीने प्रकाशित करण्याची कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.