शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना तूर मोजणीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 18, 2017 01:58 IST

नाफेडची तूर खरेदी बंद; तेल्हारा तालुक्यातील नोंदणी केलेले २७00 शेतकरी वंचित.

अनिल अवताडे लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तूर खरेदीचा निर्णय घेतला; पण या खरेदीचा काहीच ताळमेळ नसल्याने शासनाचा तूर खरेदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. तालुक्यामधील अजूनही नोंदणी केलेले २७0५ शेतकरी तूर मोजणीचा नंबर लागल्याच्या फोनची वाट बघत आहेत. शेतकर्‍यांची ४५000 क्विंटल तूर घरात पडून आहे. शेतकर्‍यांच्या तुरीच्या मालाला बाजारात योग्य तो भाव मिळत नसल्याने शासनाने ५,0५0 रुपये या भावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांनासुद्धा समाधान वाटले; पण हा निर्णय आपल्या जीवावर उठेल, अशी कल्पनाही शेतकर्‍यांना नव्हती. कारण शासनाचे तूर खरेदीबाबतचे वेळोवेळी बदलत गेलेले नियम व अटी तसेच तूर खरेदी बंद-चालू या ना त्या मार्गाने मध्यंतरी येणारे अडथळे हे सर्व शेतकर्‍यांवरच लादले गेले. त्यामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप किंवा आर्थिक फटका बसला. तूर खरेदीची सबएजंट म्हणून खरेदी-विक्री संस्था काम पाहत आहे. या संस्थेने तूर खरेदीमध्ये कशा पद्धतीने तूर खरेदी केली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एकदा २७ तर दुसर्‍यांदा १६३ निकृ ष्ट दर्जाची तूर आल्याने खरेदी केलेली तूर अकोला येथील वेअर हाउसमधून परत आली. बाजार समितीला नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांना क्रमानुसार टोकन देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खरेदी सुरू असताना बाजार समितीने ८५ टोकन दिले. पैकी ३८ शेतकर्‍यांच्या तुरीचे मोजमाप झाले. नंतर तूर खरेदी बंद झाली; पण दिलेल्या टोकनपैकी ४७ शेतकर्‍यांजवळ टोकन व नंबर असूनही तूर मोजल्या गेली नाही व नोंदणी केलेल्या २७0५ शेतकर्‍यांना बाजार समितीने मोजमापाकरिता फोन करून आपली तूर मोजणीकरिता घेऊन या, असा फोन करणे व फोन केल्यानंतर शेतकरी आल्यास त्यांना टोकन देणे, असे बंधनकारक आहे; पण नाफेडने तूर खरेदी बंदचा आदेश दिल्याने गेल्या एक महिन्यापासून नोंदणी केलेले शेतकरी फोन येण्याची वाट पाहत आहेत. २ जूनपासून खरेदी बंद आहे. जोपर्यंंत शासनाचा आदेश येत नाही, तोपर्यंंत तूर खरेदी करता येणार नाही.- वसंतराव बोडखे,व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था, तेल्हारा.

शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अनेक दिवसांपासून मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पेरणीच्या काळात त्याने विकलेल्या मालाची रक्कम त्याला मिळाली नाही, याचे दु:ख आहे. तत्काळ तूर खरेदी सुरू करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावावा.- सुरेश तराळे,सभापती, कृ षी उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा.