शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लिलावासाठी पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणच्या मान्यतेची प्रतीक्षा

By admin | Updated: December 26, 2014 01:09 IST

अकोला जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव.

अकोला : जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचा लिलाव करण्यासाठी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता प्राप्त झाली असली तरी पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावासाठी राज्य पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणकडून केव्हा मान्यता प्राप्त होते, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे. गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत लिलाव करण्यात आलेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत गत सप्टेंबरअखेर संपुष्टात आली. या पृष्ठभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव गत सप्टेंबरमध्ये राज्य पर्यावरण समिती, राज्य पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरण आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीमार्फत गत २२ डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली. त्यापूर्वी १८0 रेतीघाटांच्या लिलावास विभागीय आयुक्तांकडूनही मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता प्राप्त झाली असली तरी पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणकडून मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावासाठी राज्य पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणकडून केव्हा मंजुरी दिली जाते, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांच्या लिलावासाठी राज्य पर्यावरण समितीकडून मान्यता मिळाली आहे; मात्र राज्य पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणकडून मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणकडून मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुनील पाटील यांनी स्पष्ट केले.