शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टी गमावलेल्या नेत्ररुग्णांची ‘विट्रेक्टॉमी’ शस्त्रक्रिया

By admin | Updated: November 5, 2015 02:02 IST

जे.जे. रुग्णालयात जाऊन पालकमंत्र्यांनी केली चौकशी.

अकोला: वाशिम येथील सामान्य रुग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याने १0 ते १२ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली. या सर्व रुग्णांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर ह्यविट्रेक्टॉमीह्ण शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी अकोला व वाशिम जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भरती रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. संचालक आरोग्य डॉ.पवार, नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ.रत्ना पारीक यांनी रुग्णांच्या प्रकृतीबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना माहिती दिली आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सुद्धा सांगितले. वाशिम येथील सामान्य रुग्णालयात १७३ रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १0 ते १२ वृद्धांच्या डोळय़ांची जळजळ आणि दृष्टी धुसर झाल्याची तक्रार आली. रुग्ण वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील नेत्ररोग तज्ज्ञांनी सर्व रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला. रुग्ण येथील रुग्णालयात भरती झाल्यावर नेत्ररोग तज्ज्ञांनी सर्व रुग्णांची तपासणी केली आणि तातडीने त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविले. याठिकाणी या सर्व रुग्णांवर ह्यविट्रेक्टॉमीह्ण पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, ही घटना अकोला व वाशिम जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना कळल्यावर त्यांनी बुधवारी जे.जे. रुग्णालयामध्ये जाऊन सर्व नेत्र रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. १७३ नेत्र रुग्णांच्या घरी जाऊन चौकशी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्या आदेशानुसार वाशिम येथील सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या १७३ रुग्णांच्या घरी जाऊन वाशिम येथील वैद्यकीय चमूने चौकशी केली आणि त्यांची तपासणी केली. दरम्यान, चमूला ४ ते ५ रुग्णांची सुद्धा दृष्टी धुसर झाल्याचा प्रकार समोर आला. वैद्यकीय चमूने या रुग्णांना सुद्धा मुंबईला रवाना केले. नागपूरची चमूही पोहोचली वाशिममध्ये वाशिम सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर येथील दोन नेत्ररोग तज्ज्ञांच्या समितीने वाशिम सामान्य रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करणार्‍या नेत्ररोग तज्ज्ञांची चौकशी केली आणि प्रकरणाची तपासणी केली. तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने सुद्धा रविवारी वाशिमला जाऊन प्रकरणाची चौकशी केली.