शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

रस्त्यासाठी लोणसना ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:37 IST

मूर्तिजापूर (अकोला): अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दुर असलेल्या लोणसना गावाच्या रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदने शासनाकडे दिली. परंतू आजपर्यंत या गावाला रस्ता झाला नसल्याने ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

- संजय उमक

मूर्तिजापूर (अकोला): अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दुर असलेल्या लोणसना गावाच्या रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदने शासनाकडे दिली. परंतू आजपर्यंत या गावाला रस्ता झाला नसल्याने ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर व जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन ४ महिन्यापुर्वीच गावकऱ्यांनी दिले होते. गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश करू, नये असे फलकच लावण्यात आले आहे.तालुक्यातील बहूतेक शेवटचे आणि अडगळीत पडलेले लोणसना गाव. मुख्य रस्त्यापासून या गावापर्यंत जाणाºया रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे. हा रस्ता व्हावा यासाठी गावकºयांनी शासन दरबारी अनेक निवेदने दिली आहे. अनेक वर्षांपासून या गावाला रस्ताच नसल्याने गावकरी वैतागून गेले आहेत.येणाºया प्रत्येक निवडणुकीत गावकरी मतदान करणार नसून निवडणूकीवर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर व जिल्हा अधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले होते. आमच्या गावचा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत. दोन किलोमीटर रस्ता नाही, म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी १२ किलोमीटरचे अंतर पार करीत शाळेत जावे लागते. पावसाळ्यात ३ ते ४ महिने गावातील मुले शाळेतच जाऊ शकत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते. अशा परिस्थितीत आम्ही जगतो, आम्ही या गावचे नागरीक नाही का असा सवालही गावकºयांनी निवेदनात केला आहे.या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयत २२ जानेवारी रोजी गावातील नागरीकांची सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये उपस्थित अधिकाºयांनी निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निधी उपलब्ध झाला तर निवडकीपुर्वी कामाला सुरुवात करण्यात येईल. अन्यथा निवडणूकीत नंतर रस्ता बांधनीला सुरुवात होईल. या उत्तराने गावकºयांचे अंशत: समाधान झाल्याने उपरोक्त सभेत बहिष्कार मागे घेण्यात आला होता. परंतु निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष रस्ता बांधनीला सुरुवात झाली नसल्याने आम्ही प्रत्येक निवडणूकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर ठाम असून येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे.याविषयी गावात फलक लावून कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावात प्रवेश करू नये,असे म्हटले आहे.सध्या परिस्थितीत आमच्याकडे कुठेही निवेदन गावकºयांनी दिलेले नाही. ७ व १४ जानेवरीला कल्याणदास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली गावकºयांनी बहिष्काराची निवेदने दिली होती. त्या निवेदना संदर्भात आम्ही गावकºयांची २२ जानेवारी रोजी एक सभा घेतली. सभेत गावकºयांचे समाधान झाल्याने त्या दिवशी गावकºयांनी आपला बहिष्कार मागे घेतला होता.- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूरनिवडणूकीवर घातलेला आमचा बहिष्काराचा निर्माण ठाम असून त्या संदर्भात उपविभागीय अधिकाºयांना निवेदने गावकºयांनी दिली आहे. त्या बाबतीत आम्ही एक फलकही गावाच्या दर्शनीय भागात लावला आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा संपूर्ण निधी निवडणुकीपूर्वी उपलब्ध झाला तर आम्ही बहिष्कार मागे घेऊ, निधी सोमवार पर्यंत उपलब्ध होईल असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.- प्रकाश मोरे, सरपंच, लोणसना२२ जानेवारीला उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सभा झाली होती. त्या सभेत आम्ही आमचा निर्णय मागे घेतलेला नाही. ५ फेब्रुवारी रोजी आम्ही उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना बहिष्कार मागे घेतला नाही या बाबतचे निवेदन दिलेले आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आमचा बहिष्काराचा कायम राहील.- कल्याणदास लाहोटी, निवेदन कर्ता, लोणसना

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMurtijapurमुर्तिजापूर