शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गावनिहाय ‘वॉटर ऑडिट’

By admin | Updated: March 11, 2015 01:35 IST

जिल्हा प्रशासनामार्फत गावनिहाय पाण्याचा ताळेबंद.

संतोष येलकर / अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये गावनिहाय लोकसंख्या, पाण्याची आवश्यकता, गाव शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी याबाबत सर्वंकष माहिती घेऊन, गावनिहाय पाण्याचा ताळेबंद (वॉटर ऑडिट) जिल्हा प्रशासनामार्फत फेब्रुवारीअखेर करण्यात आला.राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली.या गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत निवड करण्यात आलेल्या गाव शिवारात पडणारा पाऊस, गावाची लोकसंख्या, पिण्याचे पाणी व संरक्षित ओलितासाठी लागणारे पाणी, गाव शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी आणि पाणी अडविणे व जिरविण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात कृषी विभागामार्फत गावनिहाय माहिती घेण्यात आली. या माहितीच्या आधारे गावनिहाय पाण्याचा ताळेबंद (वॉटर ऑडिट) करण्यात आला. या ताळेबंदानुसार जिल्ह्यातील २00 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांचे आराखडे संबंधित यंत्रणांकडून तयार करण्यात येत आहेत.