शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बुलडाण्यात ८ महिन्यांपासून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद

By admin | Updated: October 19, 2016 16:20 IST

बुलडाणा येथील शिवारात तळ ठोकून बसलेल्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश मिळाले.

ऑनलाइन लोकमत
नांदुरा, (बुलडाणा), दि. १९ -  शिवारात तळ ठोकून बसलेल्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात बुधवारी यश आले असून स्थानिक शेतकºयांच्या मदतीने वन विभागाने सापळा लावून बिबट्याला पकडल्यामुळे वडीसह परिसरात नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला.
राष्ट्रीय महामार्गावरील वडी शिवारात जिगांव उपसा सिंचन योजनेची पाईप फॅक्टरी असून या परिसरात गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य होते. कित्येकदा अनेकांना या बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. वन विभाग ब-याच दिवसांपासून बिबट्याच्या मागावर होता. दरम्यान पाईपाच्यामध्ये एक पिंजरा ठेवण्यात आला होता. सदर पिंज-यात दोन भाग असून एका भागात बिबट्याला सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली होती तर दुसºया बाजूचे गेट बिबट्याला प्रवेशाकरिता मोकळे ठेवण्यात आले होते. बकरीच्या आवाजामुळे बिबट्या पिंजºयात शिरताच गेट बंद झाल्याने बिबट्या अडकला. सकाळी ६ वाजेच्या दरम्यान शेतकरी अरुण करुटले व वनरक्षक एच.एच. पठाण यांना बिबट्या पिंजºयात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आर.एफ.ओ. रवींद्र कोंडावार यांना फोन भ्रमणध्वनीवरुन माहिती दिल्यानंतर कोंडावार घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर त्यांनी बिबट्याचे मेडिकल करण्यासाठी डॉक्टर बोलावले. चाचणीत बिबट्याचे फीटनेस योग्य असल्यामुळे त्याला वाहनातून अभयारण्यात सोडण्याकरिता वन विभागाच्या कर्मचाºयांनी नेले. सहाय्यक वनसंरक्षक खामगाव पायघन,  डीएफओ बी.टी. भगत हे सुध्दा वडी येथे हजर झाले होते.
 
 
शेतक-यांनी घेतला पुढाकार 
गेल्या आठ महिन्यांपासून सदर बिबट्याने परिसरात उच्छाद मांडला होता. अनेक शेतकºयांच्या बकºयांवर हल्ला करून बिबट्याने ठार केल्याने नुकसान झाले होते. तर बिबट्याच्या भितीने शेतात मजूर येत नव्हते. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शेतकºयांनी बिबट्यावर पाळत ठेवली होती. शेतकºयांच्या पुढाकारानेच वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्या पकडल्या गेल्याने  शेतकºयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.