शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

विदर्भातील लोकर उत्पादकांना हवी बाजारपेठ !

By admin | Updated: December 9, 2015 15:48 IST

वर्षाकाठी ७४.६८ मे.टन लोकरीचे उत्पादन.

नीलेश शहाकार/बुलडाणा: शेतीला पूरक असलेल्या विदर्भातील लोकर व्यवसायाला स्थानिक बाजारपेठ नसल्यामुळे घरघर लागली आहे.पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसायातून दुष्काळी भागात मेंढपाळ शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: अल्पभूधारक शेतकरी व धनगर समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे. विदर्भातील सहा जिल्ह्य़ात वर्षाला साधारणत: ७४.६८ मे. टन लोकर निर्मिती होते. ग्रामीण शेतकर्‍यांसाठी हा शेतीपूरक व्यवसाय असला, तरी अतिपाऊस, रोगराई यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मेंढय़ा मृत्युमुखी पडण्यामुळे अनेकदा मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. विदर्भात लोकरीसाठी कुठलीही संघटित बाजारपेठ नसल्यामुळे लोकरीला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय पुढे टिकून राहणे कठीण होत असून, विदर्भातील लोकर व्यवसायाला चालना व बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.लोकरीसाठी हरयाणा, पंजाबची बाजारपेठमेंढय़ापासून वर्षातून दोनदा लोकर प्राप्ती केली जाते. जून-जुलैत पहिल्यांदा आणि सहा महिन्यानंतर लोकर काढली जाते. एका मेंढीपासून सरासरी ५८५ ग्रॅम लोकर मिळते. एकूण प्राप्त झालेल्या लोकरीपैकी २0 टक्के लोकर घोंगड्या व लोकरी कापड उत्पादनासाठी तर उर्वरित ८0 टक्के लोकर उत्तरेकडील राज्यातील हरियाणा, पंजाब येथील व्यापारी, मिलमालक लष्करासाठी लागणार्‍या बरॅक ब्लँकेटच्या उत्पादनासाठी खरेदी करतात.लोकर खरेदी बाजारपेठ नाहीविदर्भातील बुलडाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, वर्धा या सहा जिल्ह्यात वर्षाला ७४.६८ मे.टन लोकर निर्मिती केली जाते. यातून शेतकरी व मेंढपाळाला चांगले उत्पन्न मिळू शकते; मात्र विदर्भात लोकरीसाठी मुख्य बाजारपेठ उपलब्ध नाही. सातारा, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, जालना, बीड, नशिक, औरंगाबाद येथे बाजारपेठा आहेत; मात्र तेथे लोकर नेऊन विकणे शेतकर्‍यांना परवडणारे नाही.२0१५ मध्ये झालेले सहा जिल्ह्यातील वार्षिक लोकर उत्पादनजिल्हा                         लोकर(मे.टन)                       मेंढीबुलडाणा                       ५२.२७                                  ८१९0१अमरावती                     १३.७0                                 ५८४0९वाशिम                           0.७५                                 १0६४८यवतमाळ                       ५.११                                 २0१५२अकोला                          0.६५                                  ६८३१वर्धा                               २.२0                                 २४७२एकूण                          ७४.६८                                  १,८0४१३