शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतक-यांना मिळणार सघन सिंचन योजनेचा लाभ!

By admin | Updated: September 10, 2015 01:49 IST

केंद्र सरकारने ३२00 कोटी रुपयांची पाच वर्षांसाठी तरतूद.

अकोला : विदर्भात विदर्भ सघन सिंचन विकास प्रकल्प (व्हीआयआयडीपी) योजना राबविण्यात येत असून, या योजनेला राबविण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी ३२00 कोटी रुपयांची पाच वर्षांसाठी तरतूद केली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी उर्वरित महाराष्ट्र व विदर्भ असे योजनेचे स्वरू प करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मूलस्थानी जलसंधारण कॅनॉल बनवणे व देखभाल याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पिकांना संरक्षित ओलित करण्यासाठी, केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संरक्षित ओलित करण्यासाठी ठिबक, तुषार संचाची खरेदी करण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे. या योजेनचा शेतकर्‍यांना चांगला लाभ होत असून, पाण्याचा वापर कमी होत असल्याने पाण्याची बचत होत आहे. सुरुवातीला संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. तथापि विदर्भातील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होण्यासाठी तीन वर्षांपासून ही योजना विभागण्यात आली आहे. विदर्भात विदर्भ सघन सिंचन विकास प्रकल्प या नावाने, तर उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. विदर्भात ही योजना सुरू झाली; परंतु शेतकर्‍यांना त्यांचे मंजूर अनुदान वेळेवर मिळत नसल्याने विदर्भातील शेतकरी त्रस्त आहे. उर्वरित महाराष्ट्रातील एनएमएएमआय योजनेचे अनुदान वेळेवर उपलब्ध होत असल्याने विदर्भाला स्वतंत्र योजना देऊन फायदा काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. सलग पाच वर्षांंपासून पावसाच्या अनियमिततेचा फटका विदर्भातील शेतकरी सहन करीत आहे. पाऊसच नसल्याने पीक उत्पादन घटले आहे. काही शेतकर्‍यांनी शेततळे व पॉड आदी माध्यमातून पाणी संकलित केले आहे. परंतु, हे पाणी पिकांना देण्यासाठी संचाची व्यवस्था नाही आणि बाजारातून ठिबक, तुषार संच खरेदी करण्याची ऐपत नसल्याने शेतकर्‍यांना पाणी असून, पिकांना देता येत नसल्याचे चित्र आहे.