शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनाशून्य कारभाराने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: June 28, 2016 02:30 IST

सर्पदंश झालेला रुग्णही उपचाराविना; विष प्राशन केलेल्यांवर चार तासानंतर उपचार.

सचिन राऊत / अकोलाबाश्रीटाकळी तालुक्यातील वरखेड वाघजळी येथे विषारी औषध प्राशन केलेल्या महिला व युवकास तसेच टिटवा येथील एका इसमास सर्पदंश झाल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या तिघांवरही तब्बल ४ तासानंतर उपचार सुरू केल्याने महिलेचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या बेताल आणि संवेदनशून्य कारभारामुळे महिलेचा बळी गेला तर युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.वरखेड-वाघजळी येथील रहिवासी शालूबाई गौतम करवते (३५) व त्यांचा पुतण्या विक्की विलास करवते (२७) या दोघांनी सोमवारी सायंकाळी विष प्राशन केले. त्यामुळे या दोघांनाही उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले; मात्र या ठिकाणचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नैताम यांच्यासह डॉ. घोरपडे, डॉ. डवंगे, डॉ. अपेक्षा मालविया हे एकही उपस्थित नसल्याने या दोघांवर रात्री ११ वाजेपर्यंत कोणतेही उपचार करण्यात आले नाही. या प्रकाराची माहिती आ. रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी सवरेपचार रुग्णालय गाठून अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना या प्रकाराबाबत विचारणा केली; मात्र कार्यकर्ते यांनी सदर प्रकारावर आ.सावरकर यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. ७ वाजता दाखल केलेल्या रुग्णांवर रात्री १0 वाजेपर्यंत प्राथमिक उपचारही करण्यात न आल्याने शालूबाई करवते यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या सावरकरांनी युवकावर तातडीने उपचार करण्यात यावे यासाठी बहुतांश डॉक्टरांना फोन करून उपचार करण्यास सांगितले; मात्र डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. टिटवा येथील रहिवासी मारोती गंगाराम गावंडे यांना सर्पदंश झाल्याने त्यांनाही रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरच नसल्याने त्यांनाही उपचाराविना खुर्चीवर बसविण्यात आले. सवरेपचारमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आ. सावरकर यांनी केला. तीन ते चार तास रुग्णांवर प्राथमिक उपचारही होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच गंभीर व अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी अधिष्ठात डॉ. राजेश कार्यकर्ते पर्यायी व्यवस्था करीत नसल्याचे दिसून आले. सवरेपचारमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर वेळेत हजर नसल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. नेहमीच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णांचा कारभार चालविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने रुग्ण त्यांचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकार घडले आहेत.