शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव वन परिसरात अतिशय दुर्मीळ ‘गडगळ्या’ कंद आढळला!

By admin | Updated: June 28, 2016 01:57 IST

खामगाव वन परिसरात अत्यंत दुर्मीळ औषधी वनस्पती असलेला गडगळय़ा कंद आढळून आला आहे.

अनिल गवई/ खामगाव (जि. बुलडाणा)विजेच्या कडकडाटानंतर उमलणारा आणि आयुर्वेदात औषधी गुणधर्म असलेला अतिशय दुर्मीळ असा 'गडगळ्या'कंद खामगाव वन परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात हा कंद कुतुहलाचा विषय बनला असल्याचे दिसून येते.नैसर्गिक वनस्पतींपैकी काही वनस्पती या निसर्ग चक्रानुसार उमलतात. तसेच त्यांची वाढही निसर्ग चक्रावर अवलंबून असते. या वनस्पती अतिशय दुर्मीळ असल्याने, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे दुर्मीळ वनस्पतींकडे कुणाचे फारशे लक्ष नसते; मात्र जाणकार आणि वनस्पती तज्ज्ञ दुर्मीळ वनस्पतीच्या कायम शोधात असतात. पावसाळा लागल्यानंतर डोंगराळ भागासह वनांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पतींची उत्त्पती होते. दरम्यान, काही वनस्पती या विजेच्या कडकडाटानंतरही उमलतात. यामध्ये 'गडगळ्या' कंद यापैकीच एक असून महाराष्ट्रातील अतिशय दुर्मीळ प्रजातीमध्ये याची गणना होते. पुणे परिसरातील लोणावळा, खंडाळा येथील जंगलात हा कंद आढळून येतो. पुणेरी भाषेत त्याला 'कडकड्या', 'वीजकुट्या' संबोधल्या जात असल्याची माहिती वनस्पती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, अतिशय दुर्मीळ वनस्पती असलेला हा 'गडगळ्या' कंद खामगाव येथील पक्षी मित्र तथा वनस्पती तज्ज्ञ संजय गुरव यांना तालुक्यातील बोथा जंगलात आढळून आला आहे.मशरूमच्या प्रजातीत समावेश!सुमारे ७-८ इंचापर्यंंत हा कंद वाढतो. हा कंद मशरूमच्या प्रजातीत मोडत असून, मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात आलेल्या पावसात अनेक प्रकारचे मशरूम प्रकारातील कंद उगवतात. यापैकी बहुतांश कंदाचा खाण्यासाठी वापर केला जातो. तसेच दुर्मिळ औषधी गुणधर्मही या कंदात आढळतात. दरम्यान, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबधी विकार, दाहक आतडी रोग आणि कर्करोगावर औषध म्हणून उपयोगी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.