अकोला: जिल्ह्यात सोमवारी पाच केंद्रांवर कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत सहाव्या सत्रात ३२८ लाभार्थींनी लस घेतली. दिवसाला किमान शंभर लाभार्थींची अट रद्द केल्यानंतरही लसीकरणाचे प्रमाण घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून, सोमवारी मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी येथे लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये पहिल्याच दिवशी बार्शीटाकळी येथे ७४, तर मूर्तिजापूरमध्ये ६५ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे पाच केंद्रांवर मिळून दिवसभरात एकूण ३२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. पहिल्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर आणि ग्रामीण रुग्णालय, बार्शीटाकळी येथे वैद्यकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता.
केंद्रनिहाय लसीकरण
केंद्र - लाभार्थींची संख्या
जिल्हा स्त्री रुग्णालय - ८२
जीएमसी - ३४
ओझोन रुग्णालय - ७३
मूर्तिजापूर - ६४
बार्शीटाकळी - ७४