शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ८२१ चाैरस मीटर उभारले अनधिकृत बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

पश्चिम झाेनमधील गीतानगर, गंगानगर, अकाेली बु., हिंगणा परिसरात असंख्य रहिवासी इमारती डाैलाने उभ्या आहेत, तसेच काही इमारतींचे निर्माणकार्य सुरू ...

पश्चिम झाेनमधील गीतानगर, गंगानगर, अकाेली बु., हिंगणा परिसरात असंख्य रहिवासी इमारती डाैलाने उभ्या आहेत, तसेच काही इमारतींचे निर्माणकार्य सुरू आहे. नगररचना विभागाने मंजूर केेलेला प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवत काही बहाद्दर मालमत्ताधारक मनमानीरीत्या इमारतींचे बांधकाम करीत आहेत. यामुळे शहराच्या नियाेजनाची पुरती वाट लागत आहे. दरम्यान, गीतानगरमध्ये नावकार बिल्डरर्स अँड डेव्हलपर्सतर्फे भागीदार राजकुमार जैन यांनी नगररचना विभागाकडे ८४० चाैरस मीटर बांधकामाचा प्रस्ताव सादर केला हाेता. हा प्रस्ताव मनपाने मंजूर केल्यानंतर नियमांना धाब्यावर बसवीत इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मनपाने इमारतीचे माेजमाप केले असता, मंजूर नकाशाव्यतिरिक्त तब्बल ८२१.६८ चाैरस मीटरचे अनधिकृत बांधकाम उभारल्याचे समाेर आले. शुक्रवारी पश्चिम झाेनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी इमारतीचा अनधिकृत भाग ताेडण्याला प्रारंभ केला.

साेमठाणा येथेही कारवाई

यादरम्यान, सोमठाणा रोड येथे भरतसिंग राजपूत यांच्या रेणुका डुप्‍लेक्‍समध्‍ये समोर व मागील बाजूने समास अंतर न साेडता अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. यावेळी राजपूत यांच्या इमारतीवरही कारवाई करण्‍यात आली.