शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टायफाइडने डाेकेवर काढले;उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:20 IST

मागील दीड वर्षापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासनाने काेराेनाची नियमावली शिथील केली असली तरी नागरिकांना ...

मागील दीड वर्षापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासनाने काेराेनाची नियमावली शिथील केली असली तरी नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहून अनेक महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेले नागरिक सुसाट निघाल्याचे दिसत आहे. काेराेना अद्यापही कायम असल्याची जाणीव असतानादेखील ऐन पावसाळ्यात रस्त्यालगत उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याचे परिणाम समाेर आले आहेत. सर्दी, अंगदुखी, ताप, खाेकला, घशात खवखव आदी व्हायरल फिव्हरची साथ पसरण्यासाेबतच आता टायफाइडचे रुग्ण माेठ्या संख्येने आढळून येत आहेत. टायफाइडपासून वाचण्यासाठी दूषित पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाणीपुरी उठली अकाेलेकरांच्या जीवावर

पावसाळ्यात साथराेगांचा फैलाव अधिक तीव्रतेने हाेताे. पाेटदुखी, उलटी हाेणे, छातीत जळजळ यांसह टायफाइडच्या प्रसाराला पाणीपुरी कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या तिखट पाण्यात विक्रेता अनेकदा हात बुडवताे. हात पुसण्यासाठी मळकट कापडाचा सतत वापर हाेताे. सदरचे पाणी आरओ प्लांटचा असल्याचा दावा विक्रेता करतात. हीच पाणीपुरी अकाेलेकरांच्या जीवावर उठल्याचे डाॅक्टर सांगतात.

या ठिकाणी खवय्यांची गर्दी

गांधी चाैकातील चाैपाटी, जय हिंद चाैकातील दहीवडा, बागातील देवी मंदिरासमाेर, कारमेल काॅन्व्हेंटलगतचा परिसर, जठारपेठ चाैक, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचा परिसर, जिल्हा परिषदेची आवारभिंत, सर्वाेपचार रुग्णालयाची आवारभिंत, नेहरू पार्क चाैक, मनपाच्या एलबीटी कार्यालयाची आवारभिंत तसेच संत तुकाराम चाैकात उघड्यावरील खाद्यपदार्थांसाठी खवय्ये चांगलीच गर्दी करीत असल्याचे दिसून येते.

उघड्यावरील चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याऐवजी घरीच नाश्ता, किंवा पदार्थ तयार करण्याची गरज आहे. फळांचे सेवन करणे आराेग्यासाठी हितकारक आहे, जेणेकरून रुग्णालयात जाण्याची वेळ येणार नाही.

- डाॅ. अस्मिता पाठक, वैद्यकीय आराेग्य अधिकारी मनपा