शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीतील आरोपी सुटले; नंबरप्लेट बनविणारा अडकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:18 IST

अकोला: ऐशोआरामासाठी दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने, पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले.

अकोला: ऐशोआरामासाठी दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने, पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली; मात्र या प्रकरणात कोणताही समावेश नसणाऱ्या मालेगाव येथील दुचाकीची नंबरप्लेट बनविणारा युवक यात अडकला. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.रणपिसे नगरमध्ये राहणारे आकाश नंदकिशोर तायडे यांची एमएच ३0 एएक्स २२४४ क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेतला असता, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे श्रेयश ठाकरे आणि अक्षय मसने यांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी दोन दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाक्या जप्त केल्या. या प्रकरणातील एक दुचाकीवर मालेगाव येथील नितीन श्रीराम कंकाळ याच्याकडून त्यांनी नंबरप्लेट बनवून घेतली होती; परंतु पोलीस तपासात दुचाकीवरील हा नंबर बनावट असल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी मालेगाव येथून नितीन कंकाळ याला मंगळवारी अटक केली. त्याला व आरोपी श्रेयश ठाकरे, अक्षय मसने यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला तर नितीन कंकाळ याची कारागृहात रवानगी केली. आरोपीतर्फे अ‍ॅड. केशव एच. गिरी, अ‍ॅड. वैशाली गिरी यांनी काम पाहिले.