शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: April 9, 2017 01:36 IST

तीन अपघातात एक ठार पाच जखमी.

अकोला : शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी विविध ठिकाणांवर झालेल्या तीन रस्ते अपघातात एकजण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली, तर अन्य दोन अपघातांमध्ये पोलीस कर्मचार्‍यासह त्यांचे वडील आणि दोन वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसर्‍या अपघातात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रद्धा रेसिडन्सी येथील दोघे जण जखमी झाले आहेत. शहरात घडलेल्या तीन अपघातांत एक ठार झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.चांदूर येथील रहिवासी एक २९ वर्षीय युवक दुचाकीने अकोल्यात येत असताना ट्रकखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.चांदूर येथील रहिवासी समाधान ऊर्फ सोमेश्‍वर वासुदेव पद्मने (२९) हा युवक एमएच ३0 एवाय 0३८0 क्रमांकाच्या दुचाकीने बाजार करण्यासाठी अकोल्याकडे येत असताना त्याचा दुचाकीवरील तोल गेला. त्यामुळे रोडवर कोसळताच तो रेतीने भरून जात असलेल्या एम एच 0४ ४८0३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकखाली आला. यामध्ये समाधान पद्मने याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, सदरचा ट्रक खदान पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला आहे.