अकोला : येत्या जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणार्या जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींची प्रभागरचना आणि आरक्षण १३ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आले. त्यानुसार या ग्रामपंचायतींसाठी २ हजार २१0 सदस्य निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, येत्या जुलै ते डिसेंबर या कालावधीत पाच वर्षांंचा कार्यकाळ पूर्ण होणार्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर व तेल्हारा या सातही तालुक्यांतील २३४ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय जागांचे आरक्षण १३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २३४ ग्रामपंचायतींच्या ८१८ प्रभागांमध्ये २ हजार २१0 सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सध्या जिल्हा प्रशासनामार्फत मतदार याद्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडले जाणार दोन हजारांवर सदस्य
By admin | Updated: February 24, 2015 01:33 IST