शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताचे औषध विकणारे दोेघे कारागृहात

By admin | Updated: April 13, 2017 01:56 IST

अकोला- महिलेने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने परभणीतील एका मेडिकल संचालकाला अटक केली. दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.

अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका डॉक्टरकडे आया म्हणून काम करीत असलेल्या महिलेला गर्भपाताच्या किट्सची खरेदी-विक्री करताना अटक केल्यानंतर या महिलेने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने परभणीतील एका मेडिकल संचालकाला अटक केली. दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.अकोला येथे दोन दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या अवैध औषध साठ्याचे धागेदोरे परभणी जिल्ह्यातील मानवतपर्यंत असल्याचे खदान पोलीस आणि अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले आहे. खदान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मेहरुन्नीसा नामक आयाने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांचे एक पथक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रविवारी परभणी जिल्ह्यात गेले. या महिलेचे कनेक्शन असलेल्या परभणीतील मानवतमधील ‘ढमढेरे मेडिकल’मधून गर्भपाताच्या औषधांची अवैधरीत्या विक्री करण्यात येत होती. सदर महिलेला गर्भपाताच्या किट्स खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून ‘ढमढेरे मेडिकल’मध्ये पाठविण्यात आले. ढमढेरे मेडिकलच्या संचालकाने गर्भपाताच्या किट्सची विक्री केली. यावरून खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाक ून मेडिकल संचालकास रंगेहात अटक केली. महिला व मेडिकल संचालकाविरुद्ध परभणीत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अकोल्यात आणले असून, त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.