शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दोनशेवर संगणक परिचालक संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:50 IST

लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील दोनशेच्या वर संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी ‘आपले सरकार’च्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात; परंतु सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली आहे. दरम्यान, याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या.

ठळक मुद्देजाचक अटींचा ठपका ऑनलाइन सेवा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कलाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील दोनशेच्या वर संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी ‘आपले सरकार’च्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात; परंतु सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली आहे. दरम्यान, याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या.राज्यातील ग्रामपंचायती ऑनलाइन करण्याच्या हेतूने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन सेवा कार्यरत करण्यात आली. ग्रामपंचायतमधील ‘संग्राम’ सॉफ्टवेअर बदलून ‘ई-ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित केले. त्यामुळे नव्या सॉफ्टवेअरद्वारे हे संगणक कर्मचारी काम करीत होते. ‘संग्राम’ प्रकल्प संपल्यामुळे संग्राममधील सर्व संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात सामावून घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्‍वासने दिली होती; परंतु गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील २३ हजार संगणक ऑपरेटर कर्मचार्‍यांना मात्र वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. याच संगणक परिचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरून दिले आहेत. या संगणक परिचालकांसाठी ग्रामविकास विभागाने ‘टास्क कन्फर्मेशन’ ही जाचक अट तसेच अन्य अटी लागू केल्या असल्यामुळे या कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘टास्क कन्फर्मेशन’ची जाटक अट रद्द करून राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्मचार्‍यांना निश्‍चित सहा हजार रुपये वेतन देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन द्यावे, संग्राम प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवरील सर्व संगणक परिचालकांना सामावून घेण्यात यावे, नागिरकांना देण्यात येणार्‍या दाखल्यांमागे प्रोत्साहनपर ६0 टक्के कमिशन द्यावे, महाऑनलाइनकडील डिसेंबर २0१५ पासून थकीत मानधन मिळावे, अशा विविध मागण्या या निवेदनात आहेत.

राहिलेल्या संगणक परिचालकांना शासनाने तत्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू.अविनाश मातळे,जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, अकोला.-