शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस पळविणार्‍या पतीस कारावास

By admin | Updated: February 24, 2017 02:38 IST

आरोपीला सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला, दि. २३- पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी राहणार्‍या पत्नीस मोठी उमरी भागातील संस्कार कॉन्व्हेंट समोरून पळवून नेल्याप्रकरणी आठवे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी आरोपी पती प्रकाश अनंतराव हागे याला सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकाश हागे याने ओमनी कार क्रमांक एम एच१२ - ५७६७ मधून पत्नीस २८ जून २0१0 रोजी आरोपीने बळजबरीने गाडीत कोंबून नेले होते. सदरहू महिलेने अकोट फैल भागातून आपली सुटका करून घेतल्यानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांना आपबीती सांगितली. महिलेने तक्रारीत असे म्हटले की, आरोपी प्रकाश हा काहीच कामधंदा करत नसल्यामुळे आमच्यात पटत नव्हते. अशातच त्याने मानसिक छळ करणे सुरू केल्यामुळे मी माहेरी चाळीस क्वॉटर देशमुख कॉलनी गुडधी रोड येथे राहत होती. घटनेच्या दिवशी बहिणीच्या मुलीस घराजवळ असलेल्या कॉन्व्हेंटमध्ये सोडण्यासाठी आली असता आरोपी प्रकाश येथे आला व माझा मुलगा कोठे आहे, या कारणावरून माझ्याशी वाद घातला व मला गाडीत कोंबले. महिलेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी कलम ३४२ चा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यातील विशेष सरकारी अभियोक्ता सीमा शालीग्राम लोड यांनी सरकारची बाजू मांडताना सहा साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर आलेले साक्षपुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी प्रकाश हागे याला सात दिवसांच्या कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड न भरल्यास पुन्हा सात दिवस शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.