शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बारा लाखांची रोकड जप्त; व्यापारी ताब्यात!

By admin | Updated: April 14, 2017 01:48 IST

अकोला: मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या एका चांडक नामक व्यापाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.

रोकड हवालाची असल्याचा संशय: एलसीबीची कारवाईअकोला: मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या एका चांडक नामक व्यापाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गुरुवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याची पोलीस चौकशी करीत होते. व्यापाऱ्याकडील रोकड हवाला किंवा सावकारी व्यवहारासाठीची असल्याचा पोलिसांना संशय आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे यांना टिळक रोडजवळील मारवाडी प्रेस गल्लीतून एक चांडक नामक व्यापारी मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड नेत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने मारवाडी प्रेस गल्लीतून व्यापाऱ्यास ताब्यात घेतले आणि त्याला स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले. या ठिकाणी त्याच्याकडील रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. व्यापाऱ्याकडील ही रोकड हवालातील असल्याचा किंवा त्याने सावकारी व्यवसायासाठी ही रोकड आणली असावी, असा पोलिसांना संशय आहे. रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याची कसून चौकशी करण्यात येत होती. व्यापाऱ्यानेसुद्धा रोकडच्या व्यवहारासंबंधीचे कागदपत्र दाखविण्याची तयारी दर्शविली होती. पोलिसांनी रोकडबाबतची माहिती आयकर विभागाला दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, शेरअली खान, संदीप काटकर, अमित दुबे यांनी केली. चांडक नामक व्यापारी १२ लाख रुपयांची रोकड नेत होता. त्याला ताब्यात घेऊन रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागालाही माहिती देण्यात आली. चौकशी सुरू आहे. - कैलास नागरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा