शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली

By admin | Updated: October 22, 2016 02:47 IST

पोलीस स्मृतिदिनी विविध कार्यक्रम; अकोला पोलीस दलाची मानवंदना

अकोला, दि. २२- गत वर्षभराच्या कालावधीत देशभरात पोलीस दलात कार्यरत असलेले जे पोलीस शहीद झाले त्यांना २१ ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.अकोला पोलीस मुख्यालयात शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी शहीद पोलीस स्मृतिदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. पोलीस अधिकार्‍यांच्या हस्ते शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले होते. यासोबतच शांतता समिती सदस्य, शांतिदूत, पोलीस मित्र आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. आतापर्यंत हा कार्यक्रम शासकीय होता; मात्र यावर्षीपासून पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात सर्वांनाच सहभागी करून घेण्यात येत असून त्यांनाही शहीद पोलिसांची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला शेकडो पोलीस मित्र व शांतिदूत यांची उपस्थिती होती.देशातील ४७३ पोलिसांना श्रद्धांजली देशातील ४७३ पोलिसांना श्रद्धांजली शहीद पोलिसांच्या नावाचे वाचन यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले. गत वर्षभराच्या कालावधीत देशातील जे पोलीस शहीद झाले त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशातील प्रत्येक पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.