शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या शोधात सातपुड्यातील आदिवासींचे स्थलांतर!

By admin | Updated: September 12, 2016 14:40 IST

अकोला व अमरावती जिल्ह्यात मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, या दोन्ही जिल्ह्यांमधील गावागावांमध्ये शेतमजूरांची प्रचंड टंचाई आहे.

नितिन गव्हाळे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ -  गत पंधरा दिवसांपासून अकोला व अमरावती जिल्ह्यात मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, या दोन्ही जिल्ह्यांमधील गावागावांमध्ये शेतमजूरांची प्रचंड टंचाई असल्याने शेतक-यांना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी राहणा-या आदिवासी शेतमजूरांचा आधार घ्यावा लागत आहे. सातपुडा भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे आदिवासी बांधव अल्पकाळासाठी स्थलांतर करीत आहेत. अकोला व अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतकºयांकडे आदिवासी मजूर मुक्कामासाठी आले आहेत.
गत काही दिवसांपासून मूग व सोयाबिन तोडणीला सुरूवात झाली आहे. गावांमध्ये मजूर नसल्यामुळे शेतकºयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. मूग व सोयाबिन तोडणीसोबतच शेतातील निंदण, खुरपण करण्यासाठी गावोगावच्या शेतकºयांनी सातपूडा भागात जावून आदिवासी मजूरांना स्वखर्चातून आपल्या गावी आणले आहेत. सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली आदिवासी बांधवांच्या गावे पुर्णत: खाली झाली आहेत. गाठीला पैसा आणि पोटाला भाकर मिळत असल्याने, हजारो आदिवासी मजूर मुलाबाळांसह खेड्यापाड्यातील शेतकºयांकडे कामाला आले आहेत. शेतकºयांनी सुद्धा त्यांना डोक्यावर छत, त्यांच्या भाकरतुकड्याची सोय करून त्यांना योग्य मोबदला दिल्यामुळे दरवर्षी आदिवासी मजूर शेतांमध्ये कामाला येत आहेत. अलिकडच्या दोन वर्षांमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले आहेत. मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम संपल्यानंतर आदिवासी मजूर त्यांच्या गावी परत जातात. अकोला जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, अकोला तालुक्यांसोबतच अमरावती जिल्ह्यांमधील दर्यापूर, अंजनगाव, चांदूरबाजार आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदूरा, मलकापूर आदी भागांमध्ये आदिवासी मजूर शेतीकामासाठी आले आहेत. त्यांची व्यवस्थित बडदास्त ठेवण्याचा शेतकरी बांधव प्रयत्न करीत आहेत. 
 
आदिवासी मजूरांना मिळतोय योग्य मोबदला
आदिवासी बांधव हे अल्पभूधारक आहेत. सातपूडा भागामध्ये फारसे रोजगार उपलब्ध नसल्याने, शेतीकाम करूनच आदिवासींना उदरनिर्वाह भागवावा लागतो. गावोगावच्या शेतकºयांना आदिवासी मजूर बांधवांनी मोठा आधार दिला आहे. ६0 टक्के मूग तोडणीचे काम पूर्ण झाले आहे. गावातील मजूरापेक्षा आदिवासी मजूर निक्षून मूगाच्या शेंगा तोडत असल्याने, शेतकरीही समाधानी आहेत. सध्या पाच रूपये किलोदराप्रमाणे मूगाची शेंग तोडल्या जात असून, एका घरातील चार ते पाच माणसे एक ते सव्वा क्विंटलपर्यंत मूगाच्या शेंगा तोडत आहेत. त्याचा योग्य मोबदलाही शेतकºयांकडून त्यांना दिला जात आहे. तसेच राहण्यासाठी छत, शिधाआटा, गहू, तांदूळ, तूरीची डाळ, कपडेलत्ते सुद्धा शेतकºयांकडून आदिवासी मजूरांना पुरविण्यात येत आहेत.