शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे शेगावात पथसंचलन

By admin | Updated: September 3, 2014 22:29 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शेगाव शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.

शेगाव : शेगाव शहरात मागील दोन वर्षापासून घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या शहराच्या यादीत शहराचे नाव सामिल झालेले असल्याने सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने आज स्वत: जिल्हा पोलिस अधिक्षक श्यामराव दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ६00 पोलिसांच्या ताफ्याने शेगाव शहरात पथसंचलन केले.गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव आणि शिवजयंती मिरवणुकीत घडलेल्या घटनांमुळे शांत शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या संतनगरी शेगावचे नाव अ ितसंवेदनशील शहराच्या यादीत आले आहे. यामुळे पोलिस प्रशासन या शहराकडे विशेष लक्ष देत आहे. येणार्‍या उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या असून यामध्ये विनापरवाना मंडळांवर कारवाई करणे, धार्मिकस्थळ कापडाने झाकून घेणे, शहरात अतिरीक्त कुमक व दंगाकाबू पथकासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या शहरासाठी करणे, मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समि तीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका आयोजीत करणे आदींचा उपायोजनांमध्ये सहभाग आहे. आज बुधवारी शेगाव जिल्हाभरातील पोलिसांसह राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, दंगाकाबू पथक, जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व शेगाव शहर व ग्रामीण पोस्टेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. या पथसंचलनात जिपोअ दिघावकर, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर, ग्रा.पो.स्टे.चे ठाणेदार विजयकुमार अकोत, शहराचे ठाणेदार शर्मा, जिविशाचे खुटाफळे आदींचा समावेश होता.