अकोला: वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून चालक जखमी झाल्याची घटना आपातापा-अकोला मार्गावर सोमवारी सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३० ए.बी. ६६७७ ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असताना बंडूगोटा फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटला. या अपघातात ट्रॅक्टरचालक जखमी झाला. त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
ट्रॅक्टर उलटला; चालक जखमी
By admin | Updated: May 19, 2014 20:31 IST